घरमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांचा आज पाहणी दौऱ्याचा तिसरा दिवस; शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणेची शक्यता

मुख्यमंत्र्यांचा आज पाहणी दौऱ्याचा तिसरा दिवस; शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणेची शक्यता

Subscribe

असा असणार मुख्यमंत्र्यांचा उस्मानाबाद दौरा

राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भागांमध्ये हाताशी आलेली पिकं खराब झाली आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी हवालदील झाला आहे. त्याला धीर देण्यासाठी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगवी, अक्कलकोट येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. तर आज बुधवारी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देत शेतकऱ्यांसह ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधतील. मुख्यमंत्र्यांचा आज पाहणी दौऱ्याचा तिसरा दिवस असून शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणेची शक्यता आजच्या दौऱ्यानंतर आहे.

दरम्यान रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उस्मानाबाद येथील नुकसानग्रस्त भागांचा पाहणी दौरा केला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूर दौऱ्यावर होते. परतीच्या पावसाने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. तसेच शेतीचंही मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी सोमवारी सोलापूरचा दौरा केला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सोलापुरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २५ हजार रुपये मदतीचे चेक दिले होते. मात्र ही तात्पुरत्या स्वरुपाची मदत न देता भरघोस मदत द्या, अशी मागणी बळीराजा करत आहे.

असा असणार मुख्यमंत्र्यांचा उस्मानाबाद दौरा

  • सकाळी ९.३०  वाजता – सोलापूर शासकीय विश्रामगृह येथून मोटारीने काटगावकडे (ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद) प्रयाण
  • सकाळी १०.१५  वाजता – काटगाव येथे आगमन, अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी आणि शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी
  • सकाळी १०.३० वाजता – काटगाव येथून तुळजापूर मार्गे अपसिंगा (ता. तुळजापूरकडे) रवाना
  • सकाळी ११.१५ वाजता – अपसिंगा येथे आगमन आणि अतिवृष्टीमुळे घरांची पडझड, शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी
  • सकाळी ११.३५ वाजता – अपसिंगा येथून तुळजापूर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण, तुळजापूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन आणि राखीव
  • दुपारी १२.२० वाजता – पूर परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा आणि अभ्यागतांच्या भेटी राखीव

‘दौरे बंद करा, तात्काळ मदत करा, अन्यथा रस्त्यावर उतरू’; दरेकरांचा सरकारला इशारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -