घरताज्या घडामोडीपहिला जेम्स बाँड शॉन कॉनेरी यांचे निधन; वाचा त्यांच्या माहीत नसलेल्या ००७...

पहिला जेम्स बाँड शॉन कॉनेरी यांचे निधन; वाचा त्यांच्या माहीत नसलेल्या ००७ गोष्टी

Subscribe

जगभरातील चित्रपट चाहत्यांच्या मनावर एकेकाळी अधिराज्य गाजवणाऱ्या पहिल्या वहिल्या जेम्स बाँडचा अखेर वृद्धापकाळाने मृत्यू झाला आहे. आपल्या अभिनयाने जेम्स बाँडची भूमिका लोकप्रिय करणारे शॉन कॉनेरी (सीन कॉनेरी) यांचे ९० वर्षी निधन झाले आहे. शॉन कॉनेरी (Sean Connery) यांना ऑस्कर, तीन वेळा गोल्डन ग्लोब आणि दोनदा बाफ्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

गरिबीत जन्मलेला एका मुलाचे नशीब पालटले आणि तो जगातील सर्वात आकर्षक वाटणारा जेम्स बाँड बनला. ६० वर्षांपूर्वी कुणाला माहीत होते की झोपडपट्टीत जन्मलेला एक मुलगा जगात भारी होईल. कोणत्याही ऑडिशनशिवाय सीन कॉनेरी यांना बाँडचा रोल मिळाला होता. पहिला बाँड पट ‘डॉ. नो’ हा १९६२ साली प्रदर्शित झाला होता. त्यानंतर बाँडची जादू अशी काही चालली की त्यांनी सहा बाँड पटाच्या माध्यमातून जगावर राज्य केले.

- Advertisement -

स्कॉटलंडमधील एडिनबर्गच्या झोपडपट्टीत एका आयरीश दाम्पत्याच्या पोटी शॉन कॉनेरी यांचा जन्म झाला. कॉनेरीची परिस्थिती इतकी हलाखीची होती की शालेय शिक्षण घेण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नव्हते. मजुरी करत त्यांनी शिक्षण घेतले. १७ वर्षांचे असताना त्यांना रॉयल नेव्हीमध्ये नोकरी मिळाली. मात्र नशीब त्यांना वेगळ्याच ठिकाणी घेऊन गेले. पोटात अल्सर झाल्यामुळे त्यांना नेव्ही सोडावी लागली. नेव्हीतून बाहेर पडल्यावर शॉन मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेत उतरले. १९५० च्या या स्पर्धेत शॉन तिसऱ्या क्रमाकांवर राहिले आणि तिथूनच त्यांना लाईमलाईट मिळाली.

sir sean connery james bond

- Advertisement -

मिस्टर युनिव्हर्सच्या स्पर्धेनंतर ते लंडनमध्ये आले. थोडं नाच-गाणं शिकल्यानंतर पुढच्या दीड वर्षातच त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. ७७ वर्षांच्या वयात देखील त्यांनी सर्वात कामुक पुरुषाचा खिताब पटकाविला होता. जसे वय वाढत गेले तसा तसा शॉन कोनेरी यांचा करीष्मा वाढत गेला. १९५६ साली त्यांना नो रोड बॅख हा पहिला चित्रपट मिळाला होता. चित्रपट मिळवण्यासाठी त्यांना बराच संघर्ष करावा लागला होता.

१९६२ साली पहिला बाँड पट पडद्यावर उतरला. पुस्तकात बाँडचे जे वर्णन होते, अगदी तसाच उंचपुरा, डौलदार, रुबाबदार ज्याच्यावर सुंदर तरुणी जीव टाकतात असा बाँड चाहत्यांना लाभला. ज्याच्याकडे लोकांना मारण्याचा परवाना होता. सिनेमाच्या पडद्यावर याच्यापेक्षा सुंदर गुप्तहेर तेव्हा कुणीही पाहिला नव्हता. शॉन कॉनेरी यांच्यामुळे जेम्स बाँड ब्लॉकबस्टर ठरला.

 

‘द हंट फॉर रेड ऑक्टोबर’, ‘इंडियाना जोन्स आणि द लास्ट क्रूसेड’ आणि ‘द रॉक’ या सिनेमांचा समावेश आहे. सर सीन यांना १९८८ मध्ये ‘द अनटचेबल्स’ साठी ऑस्कर मिळाला होता.

Sir Sean Connery यांचे बाँड पट

– डॉक्टर नो
– फ्रॉम रशिया विथ लव
– गोल्डफिंगर
– थंडरबॉल
– यू ओनली लिव ट्वाइस
– डायमंड्स आर फॉरेवर

dr_no_w_ursula_andress

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -