घरIPL 2020IPL 2020 : हिटमॅन इज बॅक! SRH-MI सामन्यात रोहितचे पुनरागमन

IPL 2020 : हिटमॅन इज बॅक! SRH-MI सामन्यात रोहितचे पुनरागमन

Subscribe

आज आयपीएल स्पर्धेत सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होत आहे. मुंबईने याआधीच प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला असून हैदराबादला प्ले-ऑफ गाठायचे असल्यास हा सामना जिंकणे अनिवार्य आहे. मुंबईच्या संघासाठी या सामन्याचे विशेष महत्त्व नाही. त्यामुळे मुंबईचा संघ या सामन्यासाठी काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती देईल अशी अपेक्षा होती. मात्र, याऊलट पायाला झालेल्या दुखापतीमुळे मागील काही सामन्यांना मुकलेल्या कर्णधार रोहित शर्माचे मुंबई संघात पुनरागमन झाले आहे. ‘मी पूर्णपणे फिट आहे,’ असे नाणेफेकीच्या वेळी रोहित म्हणाला.

आयपीएल स्पर्धेत १८ ऑक्टोबरला किंग्स इलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात दोन सुपर ओव्हर झाल्या होत्या. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये रोहितने मुंबईकडून फलंदाजी केली होती. मात्र, त्यानंतर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये तो क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानात उतरला नव्हता. अखेर रोहितच्या पायाला दुखापत झाल्याने तो क्षेत्ररक्षण करू शकला नाही, असे स्पष्ट झाले होते. या दुखापतीमुळे तो चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स अशा चार सामन्यांना मुकला. तसेच आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याला भारतीय संघातही स्थान मिळाले नाही. परंतु, आता तो हैदराबादविरुद्धच्या सामन्यात खेळत असल्याने त्याची दुखापत फारशी गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -