घरताज्या घडामोडीअर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर आशिष शेलारांनी शिवसेनेला लगावला टोला

अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर आशिष शेलारांनी शिवसेनेला लगावला टोला

Subscribe

आज (बुधवार) सकाळी वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक चॅनलेचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर अनेक भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपने या कारवाईवर तीव्र निषेध जाहीर केला आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी देखील ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसच्या आणीबाणीचे शिवसेना समर्थक नाही, तर व्यवस्थापक झाले आहेत, असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला आहे. तसेच हा एक कटकारस्थानाचा भाग असल्याचे म्हटले आहे.

आशिष शेलार काय म्हणाले?

‘शिवसेना काँग्रेसच्या आणीबाणीची समर्थक होती. आता काँग्रेसच्या आणीबाणीचे शिवसेना समर्थक नाही, तर व्यवस्थापक झाले आहेत. आज नियती आणि कालचक्र कसं फिरत असते हे स्पष्ट झाले आहे. तसेच सोनियांची काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी या विषयावर आपल्या पक्षांची भूमिका स्पष्ट करावी’, असे आशिष शेलारांनी आवाहन केले आहे.

- Advertisement -

पुढे आशिष शेलार म्हणाले की, ‘एका संपादकाच्या घरात घुसून, त्याला लाथा मारून, त्यांच्या मुलाला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. सरकारमधील पक्ष पोलिसांनी केलेली ही कारवाई वरकरणी व्यक्तिगत असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. नाईक कुटुंबाला न्याय कालही मिळाला पाहिजे होता, आजही मिळाला पाहिजे आणि उद्याही त्यांना आवश्यक असेल तर न्याय मिळालाच पाहिजे, ही भारतीय जनता पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. आजपर्यंत केलेल्या कुकृत्याला झाकण्यासाठी नाईक कुटुंबाची केस समोर आणली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी केलेल्या गोष्टी लपवता येत नाही. एका कटकारस्थानाचा हा भाग आहे. त्यामुळेच सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या आदेशावरून ठाकरेंच्या सरकाराने ही कारवाई केली आहे. स्वतंत्रात, संविधानाच्या गोष्टी करणारे आज मूकदर्शक बनले आहेत. हे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला घाला घालणारे आहे.’


हेही वाचा – अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर कंगनाचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -