घरताज्या घडामोडीअहमदाबादमध्ये बॉयलरचा स्फोट होऊन गोदामाचे छत कोसळले; ९ कामगारांचा मृत्यू

अहमदाबादमध्ये बॉयलरचा स्फोट होऊन गोदामाचे छत कोसळले; ९ कामगारांचा मृत्यू

Subscribe

गुजरातच्या अहमदाबाद मधील केमिकल फॅक्टरीमध्ये आग लागून स्फोट झाल्यामुळे बाजुलाच असलेल्या कापड गोदामाचे छत कोसळले. यानंतर गोदामात आगही पसरली. या दुर्घटनेत ९ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा स्फोट भीषण असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या गोदामात एकूण २४ कामगार काम करत होते.

अहमदाबादच्या नानूभाई इस्टेटमधील केमिकल फॅक्टरीत बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे भडकलेल्या आगीमुळे एका पाठोपाठ ५ स्फोट झाले. केमिकल कंपनीच्या स्फोटामुळे बाजुलाच असलेल्या कापड गोदामाला हादरा बसला. या गोदामात काम करणाऱ्या कामगारांच्या वर छत कोसळले आणि त्यात ते सर्व दबले गेले. या अपघातात ९ कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून इतरांची प्रकृती गंभीर आहे. आगीवर नियंत्रण आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून अग्निशमन दलाच्या २४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -