घरताज्या घडामोडीअर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ, जामीन मिळताच मुंबई पोलिसांकडून अटकेची शक्यता!

अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ, जामीन मिळताच मुंबई पोलिसांकडून अटकेची शक्यता!

Subscribe

वास्तू विशारद अन्वय नाईक प्रकरणात अलिबाग पोलिसांनी अटक केलेल्या रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. नाईक प्रकरणात जामीन मिळताच सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गोस्वामी यांना मुंबईतील ना.म.जोशी मार्ग पोलिसांकडून अटक होण्याची दाट शक्यता आहे. वास्तू विशारद अन्वय नाईक यांनी २०१८ साली रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे त्यांच्या फार्महाऊसवर गळफास लावून आत्महत्या केली होती. नाईक यांच्या आत्महत्येला जबाबदार असणारे रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांना अलिबाग पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. दरम्यान, अर्णब यांना अटक करण्यासाठी आलेल्या रायगड पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण करून धक्काबुक्की केल्याप्रकरणी अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या घरातील इतर दोन सदस्य यांच्यावर ना.म.जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अर्णब यांना अन्वय नाईक प्रकरणात अलिबाग न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांच्या जामिनासाठी वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. अर्णब यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी (आज) दुपारी ३ वाजता सुनावणी होणार आहे. मात्र जामीन मिळताच अर्णब यांना ना. म. जोशी मार्ग पोलीस ताब्यात घेऊन अटक करण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती पोलीस सुत्रांकडून समोर येत आहे.

- Advertisement -

अर्णब गोस्वामी यांच्या अटकेसाठी मुंबई पोलिसांकडून पूर्णपणे तयारी सुरू आहे. अटकेनंतर त्यांच्या घरातील दोन सदस्यांना देखील अटक होण्याची शक्यता आहे. त्यापाठोपाठ टीआरपी प्रकरणात देखील अर्णब यांना अटक होऊ शकते अशीही शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा – अर्णबचा पाय आणखी खोलात; TRP, हक्कभंग, पोलीस आणि बॉलिवूडची बदनामी भोवणार
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -