घरदेश-विदेशनितीश कुमारच बिहारचे मुख्यमंत्री; उद्या होणार शपथविधी सोहळा

नितीश कुमारच बिहारचे मुख्यमंत्री; उद्या होणार शपथविधी सोहळा

Subscribe

बिहारमध्ये रविवारी सत्ताधारी एनडीएची बैठक झाली. यामध्ये नितीशकुमार यांची एकमताने NDA विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली. नितीशकुमार सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होतील. NDA विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर नितीश कुमार राज्यपालांकडे गेले आणि सरकार स्थापनेटा दावा केला. राज्यपालांना भेटल्यानंतर सोमवारी सायंकाळी ४.३० वाजता शपथविधी पार पडणार असल्याचे नितीश कुमार यांनी सांगितले. मात्र, उपमुख्यमंत्री पदाचा सस्पेंस अद्याप कायम आहे.

NDA ची रविवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंहही उपस्थित होते. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. एनडीएच्या या बैठकीत चारही घटक पक्ष उपस्थित होते. एनडीएत भाजप, जेडीयू, हिंदुस्तानी अवाम मोर्चा आणि विकसनशील इन्सान पार्टीच्या १२५ आमदारांचा समावेश आहे. NDA मध्ये सर्वाधिक ७३ आमदार भाजपचे आहेत. तर जेडीयूचे ४५ आमदार आहेत. राज्यपालांचे नवीन सरकार स्थापन करण्याचे आमंत्रण मिळाल्यानंतर नितीश म्हणाले की, शपथविधी सोहळा सोमवारी सायंकाळी ४.३० वाजता होईल. तथापि, मंत्रिमंडळात कोणकोण असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एनडीएमध्ये सर्वाधिक ७४ आमदार भाजपाचे आहेत. तर जेडीयूचे ४३ आमदार आहेत. तर हिंदुस्तानी अवाम मोर्चा आणि विकसनशील इन्सान पार्टीचे प्रत्येकी ४ आमदार आहेत.

- Advertisement -

NDA च्या रविवारी पार पडलेल्या बैठकीत नितीशकुमार यांची एकमताने NDA विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे नितीशकुमार सातव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. नितीशकुमार यांची बिनविरोध नेते म्हणून निवड झाल्यानंतर एनडीएचे नेते राजभवनात रवाना झाले होते. राज्यपालांच्या भेटीनंतर सोमवारी सायंकाळी ४.३० वाजता शपथविधी पार पडणार आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री कोण असणार याबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही आहे. उपमुख्यमंत्री पदावरुन सुशील कुमार मोदी यांना डच्चू देण्यात आल्याची चर्चा आहे.

बिहारमध्ये NDA मध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा होत्या. भाजप नेत्यांनी एकीकडे नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील असे स्पष्ट केले असताना नितीश कुमार यांनी मात्र मौन बाळगले होते. यासोबतच आपण मुख्यमंत्रीपदावा दावा केला नसल्याचेही म्हटले होते. पण अखेर एनडीएच्या बैठकीत नितीश कुमार यांची नेतेपदी निवड करत चर्चांना पूर्णविराम देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -