घरदेश-विदेशसलग ४६ व्या दिवशी बरे होणार्‍या रुग्णांची संख्या अधिक

सलग ४६ व्या दिवशी बरे होणार्‍या रुग्णांची संख्या अधिक

Subscribe

कोविड-१९ रुग्णसंख्येपैकी ५.०१ टक्के सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या कित्येक आठवड्यांपासून सरासरी दैनंदिन रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट दिसून येत आहे.

नवीन नोंद झालेल्या रुग्णांपेक्षा नवीन बरे झालेल्या रुग्णांची संख्या भारतामध्ये दीड महिन्यांहून अधिक काळ जास्त आहे. सलग अकराव्या दिवसासाठी देशात ५० हजारांहून कमी रुग्णांची नोंद झाली आहे. कोविड-१९ रुग्णसंख्येपैकी ५.०१ टक्के सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या कित्येक आठवड्यांपासून सरासरी दैनंदिन रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट दिसून येत आहे.

युरोप आणि अमेरिका सारख्या देशात कोविड पॉझिटीव्ह रुग्णसंख्येत वाढ होत असताना भारतामध्ये कमी होत असलेली रुग्णसंख्या महत्त्वपूर्ण आहे. रुग्ण बरे होण्याच्या दरात सुधारणा होऊन तो ९३.५३ टक्के इतका झाला आहे. गेल्या २४ तासात ४४, ७३९ कोविड रुग्ण बरे झाले असून ३८,६१७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत ६,१२२ ने घट होऊन सक्रिय रुग्णसंख्या ४,४६,८०५ इतकी झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८३,३५,१०९ इतकी झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांपैकी ७४.९८ टक्के रुग्ण १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत. केरळमध्ये सर्वाधिक ६,६२० रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात एक दिवसात बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५,१२३ इतकी आहे तर दिल्लीत ४,४२१ नवीन रुग्ण बरे झाले आहेत. तर नोंद झालेल्या रुग्णांपैकी ७६.१५ टक्के रुग्ण १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत. गेल्या २४ तासात दिल्लीत ६,३९६, केरळमध्ये ५,७९२ तर पश्चिम बंगालमध्ये ३,६५४ नवीन रुग्णांची नोंद झाली. गेल्या २४ तासात नोंद झालेल्या ४७४ मृत्यूंपैकी ७८.९ टक्के मृत्यू १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -