घरमहाराष्ट्रदिवाळी सुट्टीनंतर अकरावीचे ऑनलाईन वर्ग पुन्हा सुरू

दिवाळी सुट्टीनंतर अकरावीचे ऑनलाईन वर्ग पुन्हा सुरू

Subscribe

आता ३ डिसेंबरपासून पुन्हा नव्याने अकरावीचे ऑनलाईन वर्ग सुरू झाले आहेत. या ऑनलाईन वर्गांना उपस्थित राहण्याचे आवाहन परिषदेमार्फत करण्यात आले आहे.

प्रवेश प्रक्रियेला विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत २ नोव्हेंबरपासून अकरावीचे ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात आले. मात्र त्यानंतर लगेच आलेल्या दिवाळीमुळे विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली. परंतु आता ३ डिसेंबरपासून पुन्हा नव्याने अकरावीचे ऑनलाईन वर्ग सुरू झाले आहेत. या ऑनलाईन वर्गांना उपस्थित राहण्याचे आवाहन परिषदेमार्फत करण्यात आले आहे.

कोरोनामुळे राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद आहेत. कोरोना व त्याचबरोबर मराठा आरक्षण यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रिया रखडली होती. शैक्षणिक वर्ष संपत आले तरी प्रवेश प्रक्रिया सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता होती. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यसााठी कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या मराठी व इंग्रजी माध्यमासाठी ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात आले होते. या ऑनलाईन शिक्षणाचा विद्यार्थ्यांना चांगला फायदा होत आहे. मात्र ११ नोव्हेंबरपासून दिवाळी सुट्ट्या जाहीर झाल्या, तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षकांच्या इतर शालेय कामकाजामुळे २ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन वर्गांचे लाईव्ह प्रक्षेपण थांबवण्यात आले होते. मात्र आता हे प्रक्षेपण ३ डिसेंबरपासून सुरु करण्यात आले आहे. तासिकांचे तपशीलवार वेळापत्रक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या https://covid१९.scertmaha.ac.in/eleventh या लिंकवर उपलब्ध करण्यात आले आहे. या वर्गांचे शाखानिहाय दैनिक युट्युब लिंक वेळापत्रकामध्ये नमूद केले असून, विद्यार्थ्यानी लिंकवरून तासिकांची माहिती घ्यावी, असे आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे उपसंचालक विकास गरड यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -