घरताज्या घडामोडीसंजय राऊतांनी दिली डिस्चार्जनंतरची पहिली प्रतिक्रिया म्हणाले,

संजय राऊतांनी दिली डिस्चार्जनंतरची पहिली प्रतिक्रिया म्हणाले,

Subscribe

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना आज लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज दिला.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर लिलावती रुग्णालयात यशस्वीरित्या अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आज (शनिवारी) संजय राऊत यांना लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली. तेव्हा संजय राऊत म्हणाले की, ‘माझी तब्येत अत्यंत ठीक आहे, चार दिवस उपचार केले. थोडा हृदयाचा त्रास होता. सगळ्यांच्या आशीर्वादाने, लिलावतीचे डॉक्टर, नर्सेस यांच्यामुळे मी आता बरा आहे. दोन दिवस विश्रांती घेऊन कामाला लागेन. डॉक्टरांनी बरेच सल्ले दिले आहेत, त्यातले जे शक्य आहेत ते पाळत राहू.’

दरम्यान विधान परिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला केवळ एक जागा मिळाली. तसचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारत प्रत्येकी दोन जागा जिंकल्या असताना महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष एकत्र लढले तर भाजपला विजयापासून वंचित ठेवता येते हे दाखवून दिले आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत म्हणाले की, ‘मी भाजपच्या दुःखात सहभागी आहे, आम्हाला नक्की आनंद आहे. अशी हार जीत होत असते. पण भारतीय जनता पक्षाचे पदवीधर मतदार संघाचे बालेकिल्ले ढासळले. यांचा विचार जर केला, तर महाराष्ट्रातले वारे हे समाजातल्या सर्व स्तरात बदलताना दिसत आहे. महाविकास आघाडीला जनतेचा पाठिंबा नाही, असं म्हणणाऱ्यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काल दाखवून दिले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – भाजपचा धुव्वा शिवसेनेचा भोपळा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -