घरफिचर्ससारांशआनंदवनातली एकाकी राजकन्या

आनंदवनातली एकाकी राजकन्या

Subscribe

एकंदर आमटे परिवाराची महती पाहता शीतल जवळ तर सोन्यासारखी माणसं होती. आदिवासींची दु:ख समजणारे अख्ख आमटे कुटुंब. हक्काचे आई वडील, आयुष्यभर साथ देणारा पती गौतम, सहा वर्षांचा मुलगा आणि अख्खी आनंदवनची माणसं, अगदी प्राणीही. असे असतानाही शीतलला मनातली अस्थिरता व्यक्त करण्याासाठी कॅनव्हास पेंटींग आणि रंग विश्वासाचे वाटले. याला काय म्हणावं. ज्या वन्यप्राण्यांना बघून भलेभले हादरतात. त्यांना माणसांवर प्रेम करणं ज्या आनंदवनाने शिकवलं त्या आनंदवनाला त्यांच्या अंगणात लहानाची मोठी झालेल्या शीतलंच मन कसं समजलं नाही.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर पुन्हा एकदा एका प्रसिद्ध व्यक्तीच्या आत्महत्येने महाराष्ट्रच नाही तर देश हादरला आहे. चंद्रपूर येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ, समाजसेवक बाबा आमटेंची नात आणि डॉक्टर विकास आमटेंची लेक डॉक्टर शीतल आमटे-करजगी यांनी सोमवारी आत्महत्या केली. मानसिक तणावातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. आनंदवन येथे विषारी इंजेक्शन टोचून त्यांनी स्वत:ला संपवलं अशी प्राथमिक माहिती आहे. पण मृत्यूला कवटाळण्याच्या आठ तास आधी त्यांनी एक कॅनव्हास पेंटींग सोशल मीडियावर पोस्ट केलं होतं. त्याला ’वॉर अ‍ॅड पीस’ असं म्हटलं होतं. त्यांच्या मनातील द्वंद्वाचं ते प्रतिक होतं का यावर आता चर्चा सुरू झाली आहे.

सुशांतने देखील मृत्यूआधी देवाघरी गेलेल्या आईच्या नावाने भावनिक पोस्ट शेअर केली होती. या दोघा नामांकित व्यक्तींच्या आत्महत्येची कारणे जरी वेगळी असतील तरी त्यांची मानसिक अवस्था मात्र माणसांच्या गराड्यात राहूनही आलेले भयाण एकटेपणं होतं हे त्यांच्या पोस्ट बघून तरी वाटतंय. म्हणूनच सुशांतने जगाचा निरोप घेण्याआधी आईला आठवत भावना व्यक्त केल्या तर शीतलच्या आजूबाजूला सगळे असूनही त्यांचं एकटेपण, रितेपण त्यांनी त्या कॅनव्हासमधून मांडण्याचा प्रयत्न केला. मनातील घुसमट व्यक्त करण्यासाठी दोन्ही व्यक्तींना एकही व्यक्ती जवळची वाटू नये. हीच खरी यांची शोकांतिका आहे.

- Advertisement -

जगातून कायमचं जाण्याआधी सहा वर्षाच्या चिमुरड्या लेकाचा साधा विचारही शीतलच्या मनाला शिवला नाही. आपण गेल्यानंतर त्याचं काय असा जगातील सगळ्याच आयांना पडणारा प्रश्नही शीतल यांना पडला नाही का एवढ्या कशा त्या अलिप्त झाल्या हेच धक्कादायक आहे.

एकंदर आमटे परिवाराची महती पाहता शीतल जवळ तर सोन्यासारखी माणसं होती. आदिवासींची दु:ख समजणारे अख्ख आमटे कुटुंब. हक्काचे आई वडील, आयुष्यभर साथ देणारा पती गौतम, सहा वर्षांचा मुलगा आणि अख्खी आनंदवनची माणसं, अगदी प्राणीही. असे असतानाही शीतलला मनातली अस्थिरता व्यक्त करण्याासाठी कॅनव्हास पेंटींग आणि रंग विश्वासाचे वाटले. याला काय म्हणावं. ज्या वन्यप्राण्यांना बघून भलेभले हादरतात. त्यांना माणसांवर प्रेम करणं ज्या आनंदवनाने शिकवलं त्या आनंदवनाला त्यांच्या अंगणात लहानाची मोठी झालेल्या शीतलंच मन कसं समजलं नाही. हिंस्त्र प्राण्याला हिंसा विसरायला लावणार्‍या आमटे कुटुंबीयांना शीतलची ढासळणारी मनोवस्था दिसली नसेल. असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. प्रकरण हाय प्रोफाईल असल्याने उत्तर केव्हा मिळेल सांगता येत नाही.

- Advertisement -

तर दुसरीकडे सुशांत बॉलीवूडस्टार होता. त्यामुळे तो नेहमीच माणसांच्या गराड्यात असायचा. त्यामुळे त्याला कसं काय एकटेपण आलं असेल असे अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहेत. शीतल यांच्याबाबतीत म्हणायचं झालं तर त्या लोकांची सेवा करण्यात इतक्या बिझी असायच्या की एकटेपणं काय हे देखील त्यांना ठाऊक नसावे असं बघून तरी वाटायचं. पण तरीही त्या एकट्या पडल्या. आपला हा एकटेपणा त्यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुक लाईव्ह पोस्टमधून जगजाहीरही केला. आनंदवनातील कर्मचारी व कुटुंबातील सदस्य आपल्यावर आरोप करत असल्याचे त्यांनी या लाईव्हमध्ये सांगितले. त्यामुळे आमटे कुटुंबातील कलह चव्हाट्यावर आला. त्यानंतर दोन तासांनी शीतल यांनी तो व्हिडीओ डिलिट केला. नंतर आमटे कुटुंबीयांनी सोशल मीडियावर एक निवेदनच जाहीर केले. ज्यात शीतलचे वडील डॉक्टर विकास, आई भारती यांच्यासह आमटे कुटुंबातील इतर सदस्यांच्या स्वाक्षर्‍या होत्या. त्यात कुटुंबीयांनी शीतलची मानसिक अवस्था ठिक नसल्याचे म्हटले होते. तसेच आमटे कुटुंबात कसलाही वाद नाही असे स्पष्ट करत त्यांनी शीतलचे सगळे आरोप तथ्यहीन असल्याचे म्हटलं होतं. त्यामुळे सगळे आमटे कुटुंब एका बाजूला आणि शीतल एका बाजूला हीच त्यांची सध्याची अवस्था होती हे देखील जगाला समजलं.

याचदरम्यान, शीतल यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सासू सासर्‍यांनी लिहिलेल्या एका पोस्टमुळे खळबळ उडाली. मुलगी नैराश्यात असताना तिला आमटे कुटुंबीयांनी एकटे का टाकल्यापासून ते घरातच मुलामुलीत भेद केल्याचा आरोप शीतलच्या सासूबाई सुहासिनी व सासरे शिरिष करजगी यांनी केला आहे. तसेच अनेक गंभीर प्रश्नही त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून उपस्थित केले आहे. शीतल जर मानसिकरित्या अस्थिर होती तर ती आनंदवनातील रुग्णांची काळजी कशी काय घेऊ शकते असा प्रश्न उपस्थित करून करजगी कुटुंबाने शीतलला तिच्या घरातील व्यक्तींनीच त्रास दिल्याचा आरोप केला.

आमटे कुटुंबासारख्या प्रतिष्ठीत कुटुंबात असे घडणे ही खरं तर दुर्दैवी गोष्ट आहे. पण करजगी कुटुंबाने आमटे कुटुंबावर केलेल्या आरोपाकडेही कानाडोळा करणे योग्य नाही. कारण आज समाजात अशाच मोठ्या व्यक्तीमध्ये एकटेपणाची भावना दृढावत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. व्यक्ती जेवढी मोठी तेवढी ती एकटी. हे सुशांत व शीतलच्या घटनांवरून तरी समोर येत आहे. यामुळेच अशा व्यक्ती मनं मोकळ करण्यासाठी विविध माध्यमांचा आधार घेत असल्याचे दिसत आहे. सुशांत पुस्तक वाचायचा, त्यात तो स्वत:ला बंदिस्त करून टाकायचा. वाचनात तो इतका एकाग्र व्हायचा की जेवण करायचंही विसरायचा. म्हणजेच तो त्या कथेशी एकरूप व्हायचा. त्यात स्वत:ला शोधायचा. त्यातील पात्रांमध्ये स्वत:चे आयुष्य शोधायचा. यातून तो अनेक व्हिडीओ त्याच्या इन्स्टावर टाकायचा. पण तरीही तो एकटा पडतोय हे त्याच्या घरातल्यांना मित्रांना कळाले नव्हते का हा देखील प्रश्न आजही अनुत्तरित आहे. असंच काहीसं शीतलच्या बाबतीत झालंय असं तरी प्रथमदर्शनी वाटतंय. शीतलला बरंच काही करायचं होतं. तिला आनंदवनचं स्मार्ट व्हिलेज करायचं होतं. आदिवासी तरुणांसाठी रोजगार निर्मिती कशी करता येईल यावर तिचं काम सुरू होतं. रुग्णसेवा तर ती करतचं होती. यामुळे माणसांच्या मनाशी ती जुळत गेली. यामुळे तिथे येथील लोकांशी व त्यांच्या समस्येशी वेगळे नाते निर्माण झाले होते. भविष्याची तिची बकेट लिस्ट मोठी होती. पण आता ती तशीच अर्धवट राहिली.

एका मुलाखतीत तिने बाळंतपणानंतर नैराश्य आल्याचं सांगितलं होतं. पण त्यातून बाहेर येण्यासाठी लागणार्‍या औषधगोळ्यांचा दुधातून बाळावर दुष्परिणाम होईल. म्हणून ती पेंटीगच्या माध्यमातून नैराश्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होती. असं तिने सांगितलं. तिच्या या तैलचिंत्रांचं तिला व्हिएतनाममध्ये प्रदर्शनही भरवायचं होतं. पण तिची ती चित्र म्हणजे तिच्या मनातला कल्लोळ होता. हे देखील डॉक्टर असलेल्या आमटे कुटुंबाला कधी कळलं नसेल का… असे अनेक प्रश्न आज उपस्थित झाले आहेत. माणसांबरोबर सतत राहणारी ही माणसं माणसांच्याच गराड्यात एकटी पडली आणि त्यांनी जगाचा निरोप घेतल्यानंतरच ती एकटी होती हे कळावं यासारखं दु:ख कधीच कोणाच्या नशिबी येऊ नये.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -