घरठाणेनिसर्गोपचाराच्या नावाखाली 'स्पा' मध्ये वेश्याव्यवसाय

निसर्गोपचाराच्या नावाखाली ‘स्पा’ मध्ये वेश्याव्यवसाय

Subscribe

या स्पा मधून ३ तरुणीची सुटका केली असून एकाला अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई ठाणे पोलिसांनीच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने केली आहे.

ठाण्यातील कोपरी परिसरात असलेल्या एका ‘स्पा’ मध्ये निसर्गोउपचाराच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी या स्पा मधून ३ तरुणीची सुटका केली असून एकाला अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई ठाणे पोलिसांनीच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने केली आहे. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात एकावर पिठा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे पूर्व कोपरी मिठबंदर रोड या ठिकाणी असलेल्या ‘मातोश्री स्पा निसर्गोउपचार आणि संमोहन केंद्र’ या ठिकाणी निसर्गोपचाराच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाला मिळाली होती. बुधवारी दुपारी या विभागाच्या पथकाने मातोश्री स्पा येथे छापा टाकला असता त्या ठिकाणी ३ तरुणी आढळून आल्या, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन स्पा चा व्यवस्थापक सुशील रणछोड तायडे (२५) याला अटक करण्यात आली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मातोश्री स्पा या ठिकाणी निसर्गोपचार आणि मसाजच्या नावाखाली वेश्याव्यसाय सुरु होता. बळीत तरुणीना या वेश्याव्यसायात लोटून त्यांच्याकडून वेश्याव्यवसायाची कामे करून घेतली जात होती अशी माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisement -

याप्रकरणी स्पा चे व्यवस्थापकांविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा पीठा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे, ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणीनीची तेथून सुटका करण्यात आली असून पुढील तपास कोपरी पोलीस ठाणे करीत आहे.


हेही वाचा – तोडी कंपाऊंडमधील इपिटॉम हॉटेलमध्ये विना मास्क ६७ ग्राहकांवर कारवाई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -