घरदेश-विदेशपाकिस्तानमुळे बंद असलेला भारत - बांग्लादेश दरम्यानचा रेल्वेमार्ग ५५ वर्षांनी होणार खुला

पाकिस्तानमुळे बंद असलेला भारत – बांग्लादेश दरम्यानचा रेल्वेमार्ग ५५ वर्षांनी होणार खुला

Subscribe

भारत पाकिस्तान दरम्यान १९६५ साली झालेल्या युद्धामुळे बंद झालेली भारत – बांग्लादेश दरम्यानची ट्रेनसेवा अखेर ५५ वर्षांनंतर पुन्हा सुरू होणार आहे. हा ट्रेनचा मार्ग हल्दीबाडी – चिल्हाटी असा होता. पण आता या मार्गावरील सेवा पुन्हा सुरू होणार आहे. ही सेवा सुरू करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून हालचाली सुरू होत्या. त्यानुसार येत्या १७ डिसेंबरपासून या मार्गावर रेल्वेची सेवा सुरू करण्यात येणार आहे.

भारत आणि पाक युद्धानंतर जवळपास ५५ वर्षे लोटली, पण या काळात एकही रेल्वेसेवा या मार्गावर सुरू नव्हती. आता येत्या १७ डिसेंबरला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या उपस्थितीत या सेवेला सुरूवात होईल. भारतातून पश्चिम बंगाल येथील हल्दीबाडी तर शेजारी देश असलेल्या बांग्लादेशच्या चिल्हाटी दरम्यान ही रेल्वेलेवा सुरू करण्यात येणार आहे. नॉर्थफ्रंटियर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याआधी १९६५ साली भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धानंतर या दोन्ही देशांना जोडणारा रेल्वेमार्ग बाधित झाला होता. त्यानंतर हल्दीबाडीच्या कूचबिहार आणि उत्तर बांग्लादेशातील चिल्हाटी दरम्यानचा मार्ग बंद झाला होता. पण आता रेल्वे अधिकाऱ्यांनी या मार्गाला सुरू करण्यासाठीची सर्व तयारी पुर्ण झाली असल्याचे स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

नॉर्थफ्रंटियर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुभान चंदा यांनीही प्रसारमाध्यमांना या मार्गाच्या अधिकृत उद्घाटनाची माहिती स्पष्ट केली आहे. त्यानुसार पश्चिम बंगालमधील चिल्हाटी येथून हल्दीबाडी येथे मालगाडी चालवण्यात येणार आहे. भारतात कटिहार डिव्हिजनमध्ये हा रेल्वेमार्ग येतो. कटिहार मंडलाचे रेल्वे महाव्यवस्थापक रविंद्र कुमार वर्मा यांनी सांगितले की परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी या रेल्वे मार्गाचा वापर पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती आम्हाला कळवली आहे. त्यानुसार आता हा मार्ग सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक औपचारिकता आता पुर्ण झाल्या आहेत. भारतातल हल्दीबाडी स्टेशन हे आंतरराष्ट्रीय सीमेपासून ४.५ किमी इतक्या अंतरावर आहे. तर बांग्लादेशमधील चिल्हाटी स्टेशन हे आंतरराष्ट्रीय सीमेवरील झिरो पॉईंटवरून ७.५ किमी अंतरावर आहे. हल्दीबाडी आणि चिल्हाटी ही दोन्ही स्थानके सिलीगुडी आणि कोलकाता या जुन्या ब्रॉड गेज रेल्वे मार्गावर होती. बांग्लादेशच्या अनेक भागातून ही रेल्वे त्यावेळी जायची.

या मार्गावर प्रवासी ट्रेन सेवा सुरू झाल्यामुळे कोलकाता ते जलपाईगुडी दरम्यान अवघ्या सात तासांचे अंतर लागणार आहे. याआधी १२ तास या प्रवासासाठी लागत होते, त्या प्रवासात आता पाच तासांची बचत होणार आहे. गुवाहाटीच्या मालीगाव, बिहार आणि पश्चिम बंगालचा काही भाग या मार्गादरम्यान येतो. या मार्गावर जेव्हा रेल्वे सेवा सुरू होईल तेव्हा कूच बिहारपासून जलपाईगुडीला जोडले जाईल. त्यानंतर हाच मार्ग कोलकात्याशी जोडला जाईल. त्यामुळे जलपाईगुडी ते कोलकाता दरम्यानची १२ तासांचे अंतर ५ तासांनी कमी होणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -