घरमहाराष्ट्र'केवळ घोषणा करणार नाही, योजनेची अंमलबजावणी करेन'

‘केवळ घोषणा करणार नाही, योजनेची अंमलबजावणी करेन’

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज औरंगाबादमधील पाणी पुरवठा योजनेसह चार महत्त्वाच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी जनतेशी संवाद साधला. इतके दिवस मला या शहराने खूप काही दिले. आता मला काम करण्याची घाई लागली आहे. या शहराचा मला वेगाने विकास करायचा आहे. केवळ भूमिपूजन झाले. कुदळ मारली म्हणजे झाले असे नाही. मी काम पूर्ण करणारच आहे. केवळ घोषणा करणार नाही तर योजनेची अंमलबजावणी करेन, असेही ते म्हणाले.

बाळासाहेबांचं स्मारक उभारणार

यासह जे काम करतोय ते धडधडीत, रोखठोकपणे करतोय. त्यामुळेच संभाजीनगरकरांचे प्रेम शिवसेना प्रमुखांच्या शिवसेना पक्षासह सरकारवरती आहे.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारणार असल्याचीही घोषणा केली. “येत्या २०२५ पर्यंत औरंगाबादमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारलं जाईल. या स्मारकात नुसता पुतळा नसेल तर या स्मारकातून अनेकांना हिंदुत्वाची प्रेरणा मिळेल”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

लोक मला आमचे लाडके मुख्यमंत्री म्हणतात. पण मला लाड वगैरे नको आहे. मला केवळ तुमचे आशीर्वाद हवे आहेत, असेही ते म्हणाले. कोरोना काळात मी घरात बसून काम केली, असेही त्यांनी सांगितले. तसेच पाणी पुरवठा योजना आता मार्गी लागली आहे. आता शहरातील गुंठेवारीचा प्रश्नही सोडवण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्ग १ मेपर्यंत सुरू करणार

नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्ग १ मेपर्यंत सुरू करणार आहोत. महामार्ग झाल्यानंतर संभाजीनगरचा वेगाने विकास होणार आहे. विमानतळाचे आपण नाव बदललं तर रहदारी वाढेल, उद्योग येत आहेत. मला आता कामं करण्याची घाई आहे, इतके दिवस मला या शहराने खूप दिलं, मला आता कामं करायची घाई आहे. भूमिपूजन झाले, कुदळ मारली इथे कामं संपलं नाही. निवडणुका आल्या म्हणून काय कामं करायची नाहीत का?, हातात घेतलेले कामं पूर्ण करणार असल्याचा निर्धारही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.


‘पवारांचं कर्तृत्व त्यांच्या प्रवासातील मोठा अडथळा ठरलं’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -