घरताज्या घडामोडीराणी बागेला २ झेब्रा जोडीवर सिंह, लांडगा, अस्वलांच्याही जोड्या मिळणार

राणी बागेला २ झेब्रा जोडीवर सिंह, लांडगा, अस्वलांच्याही जोड्या मिळणार

Subscribe

भायखळा येथील राणी बाग प्रशासन प्राणीसंग्रहालयाला देवाण-घेवाण तत्वावर 'ग्रॅट झेब्रा'ची प्रत्येकी एक जोडी विदेशातून मागवून भेट देणार आहे.

मुंबई महापालिकेचे भायखळा येथील राणी बाग प्रशासन प्राणीसंग्रहालयाला देवाण-घेवाण तत्वावर ‘ग्रॅट झेब्रा’ची प्रत्येकी एक जोडी विदेशातून मागवून भेट देणार आहे. गुजरात येथील कासरबाग प्राणी संग्रहालय आणि इंदौर येथील कमला नेहरू प्राणीसंग्रहालयाला ‘ग्रॅट झेब्रा’ची प्रत्येकी एक जोडी (१ नर+१ मादी) विदेशातून मागवून भेट देणार आहे. तर त्याबदल्यात राणी बागेला गुजरात आणि इंदौरकडून सिंहाची प्रत्येकी १ जोडी (१ नर+१ मादी) अधिक इंदौरकडूनच लांडगा आणि अस्वल यांची प्रत्येकी एक जोडी मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात राणी बागेत सिंह, अस्वल आणि लांडगा यांच्या जोडगळीतून त्यांचा परिवार वाढलेला दिसणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईतील राणी बागेला अद्यावत प्राणी संग्रहालयाचे स्वरूप पालटण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून राणी बागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणी, पक्षी आणण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पेंग्विन आणण्यात आले. त्याला मुंबईकरांनी आणि पर्यटकांनी चांगला प्रतिसाद दिला.

- Advertisement -

राणी बागेत सिंहाच्या जोडीची गरज

आता या राणी बागेत सिंहाच्या दोन जोडीची गरज आहे. त्यासाठी गुजरात येथील साकरबाग प्राणी संग्रहालयाकडे अगोदर संपर्क करण्यात आला होता. त्याबदल्यात राणी बाग प्रशासन ग्रॅट झेब्राच्या दोन जोड्या त्यांना देणार होते. मात्र, त्यासाठी होणारा खर्च जास्त असल्याने राणी बाग प्रशासनाने गुजरातबाबत थोडासा हात आखडता घेतला.

८४ लाख रुपये मोजण्याचा निर्णय

‘ग्रॅट झेब्रा’ची फक्त एकच जोडी त्यांना देण्याचा आणि त्याबदल्यात गुजरातकडून सिंहाची फक्त एकच जोडी घेण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे इंदौर येथील कमला नेहरू प्राणी संग्रहालयाने राणी बागेकडून ‘ग्रॅट झेब्रा’ची फक्त एकच जोडी घेऊन त्या बदल्यात राणी बागेला सिंह, लांडगा आणि अस्वल यांची प्रत्येकी एक जोडी देण्याचा निर्णय घेतल्याने हा सौदा राणी बागेसाठी अधिक फायद्याचा ठरला आहे. त्यानुसार, मुंबई महापालिकेच्या संमतीने राणी बाग प्रशासनाने, मे.गोवाट्रेड फार्मिंग कंपनी या कंत्राटदारामार्फत विदेशातून ‘ग्रॅट झेब्रा’ची जोडी मागविण्यात येणार असून त्यासाठी त्यास ८४ लाख ६४ हजार १९६ रुपये मोजण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भांतील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

- Advertisement -

तिसऱ्यांदा काढले टेंडर

प्रस्तवाला मंजुरी मिळाल्यापासून पुढील सहा महिन्यात या कंत्राटदाराने ‘ग्रॅट झेब्रा’ची जोडी विदेशातून आणून त्याचा पुरवठा इंदौर आणि गुजरात येथील प्राणी संग्रहालयाला करणे बंधनकारक आहे. वास्तविक, पालिकेने या कामासाठी अगोदर दोन वेळा टेंडर काढूनही त्यास योग्य प्रतिसाद न लाभल्याने तिसऱ्यांदा टेंडर काढले तेव्हा कुठे या कामाला मुहूर्त लाभला आहे.


हेही वाचा – अकरावी विशेष फेरीत ५९ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -