घरमहाराष्ट्रत्वरा करा,अर्ज भरा! ग्रामपंचायतीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

त्वरा करा,अर्ज भरा! ग्रामपंचायतीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

Subscribe

अखेरच्या दिवशी ऑनलाईनसोबतच ऑफलाईन अर्ज देखील स्वीकारले जाणार

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस असून ग्रामपंचायत उमेदवारी अर्ज ऑफलाईन देखील भरता येणार आहे. निवडणूक आयोगाने विशेष आदेश जारी करत ऑनलाइन आग्रह सोडून ऑफलाइन अर्ज भरण्याची देखील परवानगी दिली आहे. त्यामुळे आता ३० डिसेंबर म्हणजे आज संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत भरता अर्ज येणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची बुधवारी आज संपत आहे. या निवडणुकीत इच्छुक उमेदवार नामनिर्देशापासून वंचित राहू नये, यासाठी पारंपारिक पद्धतीचा अवलंबकरत ऑफलाईन अर्ज दाखल करता येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात १४ हजार ४३४ ग्रामपंचायतीचा निवडणुकांचं नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी ऑनलाइन यंत्रणा अनेक ठिकाणी हँग झाली आहे. आतापर्यंत केवळ ३ लाख ३२८४४ नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आजच्या दिवशी अर्ज दाखल करण्यास गर्दी होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने विशेष आदेश जारी करत ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाइन आग्रह सोडून ऑफलाइन फॉर्म भरण्याची परवानगी दिली आहे.

- Advertisement -

रविवारी रात्रीपासून ऑनलाइन यंत्रणा अनेक ठिकाणी हँग झाल्याने गोंधळ उडाला असून उस्मानाबाद, लातूरसह रत्नागिरीमध्ये अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी मोठी गर्दी केली. जात पडताळणीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढल्याने ऑनलाईन प्रक्रियेचा वेग मंदावला असल्याचे सांगितले जात आहे. अर्ज भरणाऱ्या उमेदवारांसठी आज शेवटचा दिवस असून या अखेरच्या दिवशी ऑनलाईनसोबतच ऑफलाईन अर्ज देखील स्वीकारले जाणार आहेत, असे निर्देश धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.

ऑनलाइन यंत्रणा अनेक ठिकाणी कोलमडली

निवडणुकीसाठी ऑनलाइन आग्रह सोडून ऑफलाइन फॉर्म भरण्याची परवानगी दिली आहे. आता आज संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत उमेदवारांना निवडणुकीसाठी आपले अर्ज भरता येणार आहेत. राज्यात १४ हजार ४३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचं नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी ऑनलाइन यंत्रणा अनेक ठिकाणी कोलमडली होती. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.


यामुळे एकनाथ खडसे EDच्या चौकशीला हजर राहण्याची शक्यता कमी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -