घरमुंबईनववर्ष धुंदीत नव्हे, शुद्धीत साजरे करा; प्राण्यांचा मानवाला संदेश

नववर्ष धुंदीत नव्हे, शुद्धीत साजरे करा; प्राण्यांचा मानवाला संदेश

Subscribe

नवीन वर्षाची सुरुवात आपल्या संस्कृतीनुसार आनंदाने, उत्साहाने आणि नववर्षाचा संकल्प ठेवून करावी, असे आवाहनही यावेळी नशाबंदी मंडळाकडून करण्यात आले. प्राण्याच्या माध्यमातून होत असलेल्या आवाहनालाही लोकांची चांगला प्रतिसाद दिला.

३१ डिसेंबरला नववर्षाचे स्वागत करताना अनेक तरुण मोठ्या प्रमाणात व्यसन करतान तर अनेकजण पहिल्यांदा व्यसन करतात. व्यसनाचे आहारी गेल्याने तरुण आपले आयुष्य उद्ध्वस्त करतात. नववर्ष धुंदीत नव्हे तर शुद्धीत साजरे करा असे प्रेमाचे आवाहन नशाबंदी मंडळाकडून ३० डिसेंबरला दुपारी ३.३० वाजता महाराष्ट्राच्या जनतेला प्राण्यांच्या माध्यमातून करण्यात आले. तसेच नवीन वर्षाची सुरुवात आपल्या संस्कृतीनुसार आनंदाने, उत्साहाने आणि नववर्षाचा संकल्प ठेवून करावी, असे आवाहनही यावेळी नशाबंदी मंडळाकडून करण्यात आले. प्राण्याच्या माध्यमातून होत असलेल्या आवाहनालाही लोकांची चांगला प्रतिसाद दिला.

पृथ्वीतालावरील कोणताही प्राणी दारु पित नाही, तंबाखू खात नाही, चरस, गांजाचे सेवन करित नाही. निर्बुध्दी असलेले हे प्राणी त्यांच्या आरोग्यास तसेच त्यांच्या जमातीस अपायकारक असलेले व्यसनांच्या सेवनापासून दुर असतात. परंतु मनुष्य प्राणी हा जगातील सर्वात बुद्धीमान असुनही तो निर्बुध्दी असल्यासारखा व्यसनांना जवळ करुन आपले व आपल्या समस्त मानव जातीचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील आहे. याच मानवावर निसर्गातील प्राण्यांची ही जबाबदारी आहे. कार्यक्रमावेळी बलून रुपी प्राण्यांनी आम्ही कोणतेही व्यसन करीत नाही, तुम्ही तर माणसे आहात असा उपस्थितांना संदेश दिला. यावेळी व्यसनमुक्तीची पोस्टर्स प्रदर्शनी, स्टँण्डीज हे जनतेचे लक्ष वेधून घेत होते.

- Advertisement -

२०२१ मध्ये मी व्यसनमुक्त राहीन अशा सह्यांच्या संकल्पाला नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. एकीकडे चंगळवादी, भोगवादी संस्कृती वाढत असताना मुंबईकरांचा या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद महाराष्ट्राला नशामुक्तीकडे नेण्याचे पाऊल आहे, असे मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मुंबईकरांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -