घरक्रीडाIPL 2021 : स्मिथची हकालपट्टी करत राजस्थानने केली 'या' खेळाडूची कर्णधारपदी निवड 

IPL 2021 : स्मिथची हकालपट्टी करत राजस्थानने केली ‘या’ खेळाडूची कर्णधारपदी निवड 

Subscribe

मागील मोसमात स्मिथच्या नेतृत्वात राजस्थानचा संघ गुणतक्त्यात तळाला राहिला होता.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या आगामी मोसमासाठी कोणत्या खेळाडूंना रिटेन करायचे आणि कोणत्या खेळाडूंना संघातून बाहेर करायचे, हे ठरवण्यासाठी बुधवारपर्यंतचा वेळ देण्यात आला होता. आयपीएलचा सर्वात पहिला विजेता संघ राजस्थान रॉयल्सने संघात महत्वाचे बदल केले आहेत. मागील मोसमात कर्णधारपद भूषवणाऱ्या स्टिव्ह स्मिथ त्यांनी संघातून बाहेर करण्याचा निर्णय घेतला आहे. युएईमध्ये झालेल्या आयपीएलच्या मागील मोसमात स्मिथच्या नेतृत्वात राजस्थानचा संघ गुणतक्त्यात तळाला राहिला होता. तसेच त्याला फलंदाज म्हणूनही चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्याने १४ साखळी सामन्यांत ३११ धावा केल्या. ‘स्मिथचा राजस्थानसोबत असलेला करार ऑक्टोबर २०२० मध्ये संपुष्टात आला. आम्ही पुन्हा त्याच्यासोबत करार न करण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे या संघाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

स्मिथच्या जागी राजस्थानने भारताचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसनची कर्णधारपदी निवड केली आहे. ‘संजूने राजस्थानकडूनच आयपीएल स्पर्धेत पदार्पण केले होते. मागील ८ वर्षांत त्याने फारच चांगली प्रगती केली आहे. २०२१ मोसमात आमच्या संघाचे नेतृत्व करण्यासाठी तो योग्य व्यक्ती आहे,’ असे राजस्थानचे संघमालक म्हणाले. मागील वर्षी राजस्थानकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सॅमसन अव्वल स्थानावर होता. त्याने १४ सामन्यांत ३७५ धावा केल्या होत्या. त्याच्या या चांगल्या कामगिरीमुळे त्याचे भारतीय संघातही पुनरागमन झाले.

- Advertisement -


हेही वाचा – IPL 2021 : ‘हा’ स्टार खेळाडू मुंबई इंडियन्स संघातून आऊट?

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -