घरक्रीडाIPL 2021 : 'हा' स्टार खेळाडू मुंबई इंडियन्स संघातून आऊट? 

IPL 2021 : ‘हा’ स्टार खेळाडू मुंबई इंडियन्स संघातून आऊट? 

Subscribe

यंदाच्या मोसमाआधी मुंबईने संघात मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

विक्रमी पाच वेळा इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने यंदाच्या मोसमाआधी संघात मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईने वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला सोडचिट्ठी दिल्याची माहिती आहे. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये मलिंगा अव्वल क्रमांकावर असून त्याने मुंबईकडून खेळताना १२२ सामन्यांत १७० विकेट घेतल्या आहेत. मात्र, मागील वर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएलच्या मोसमात तो खेळला नव्हता. वडिलांची प्रकृती ठीक नसल्याने त्याने या स्पर्धेतून माघार घेतली होती. त्याच्या अनुपस्थितीतही मुंबईने अप्रतिम खेळ करत पाचव्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले. त्यामुळे मुंबईने त्याला सोडचिट्ठी दिल्याची शक्यता आहे.

मलिंगा २००९ मोसमपासून मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. त्याने २०१८ मोसमात न खेळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, २०१९ मोसमात त्याचे मुंबईच्या संघात पुनरागमन झाले. परंतु, आता २०२१ मोसमाआधी मुंबईने त्याला संघात कायम न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच वेस्ट इंडिजचा अष्टपैलू शर्फेन रूदरफोर्डलाही मुंबईने सोडचिट्ठी दिली आहे. २०१९ आयपीएल मोसम संपल्यावर लेगस्पिनर मयांक मार्कंडेच्या बदल्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने रूदरफोर्डला मुंबईकडे पाठवले होते. मात्र, २०२० मोसमात त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -