घरमुंबईमुंबईच्या महापौरही म्हणतात 'या' तारेखेपासून लोकल सुरू होऊ शकते

मुंबईच्या महापौरही म्हणतात ‘या’ तारेखेपासून लोकल सुरू होऊ शकते

Subscribe

सर्वसामान्य मुंबईकरांची प्रतीक्षा लवकरच संपणार!

गेल्या कित्येक महिन्यांपासून मुंबईची लाईफलाईन असणारी मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी कधी पुन्हा रुळावर धावणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान सर्वसामान्य मुंबईकरांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार असल्याचं चित्र दिसतंय. यासंदर्भात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील महत्त्वाची माहिती दिली आहे. २९ जानेवारी किंवा १ फेब्रुवारीपासून मुंबई लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे.

यावेळी त्यांनी असे सांगितले की, ”लोकल सुरू होण्यासंदर्भात एक बातमी ऐकली असून लोकलसंदर्भात चर्चेसाठी मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी एक बैठक बोलावली आहे. २९ जानेवारी किंवा १ फेब्रुवारीपासून मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे.”यासंदर्भात पुढे बोलताना त्या म्हणाल्या, सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल ट्रेन सुरू झाल्या तरी लोकांनी कोरोनाचे सर्व नियम पाळावे, मास्क लावणे, स्वतःची काळजी घेणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं आवश्यक आहे.

- Advertisement -

लोकल सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज, पण…

दरम्यान, गेल्या तीन दिवसांपूर्वी महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी देखील मुंबईल लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याबद्दल माहिती दिली होती. मुंबई एमएमआर रिजनमधील कोरोनाचा आढावा घेऊन शाळा आणि लोकल ट्रेन सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिल्यानंतर मध्य रेल्वेनं महत्त्वाची माहिती दिली आहे. सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज आहे. मात्र यासंदर्भात पुढील निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा करत आहोत, अशी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी एका वृत्तसंस्थेला माहिती दिली. तर लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे राज्य सरकारला काळजी वाटत असल्याने राज्यात पुन्हा लोकल सुरू करण्याच्या की नाही या विचारात सरकार आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -