घरदेश-विदेश'हम दो हमारे पाच'चा संकल्प करा अन् मुलांना हत्यारं चालवायला शिकवा; भाजप...

‘हम दो हमारे पाच’चा संकल्प करा अन् मुलांना हत्यारं चालवायला शिकवा; भाजप नेत्याचं विधान

Subscribe

भाजप नेते विनीत अग्रवाल शारदा यांनी मंगळवारी हम दो हमारे पाचचा संकल्प करा, असं आवाहन करणारं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे मंगळवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. झेंडावंदन झाल्यानंतर भाजपचे व्यापार विभागाचे उत्तर प्रदेशमधील संयोजक विनीत अग्रवाल शारदा यांनी भाषण केलं. यावेळी त्यांनी हम दो हमारे पाचचा संकल्प करा असं आवाहन केलं. एवढंच नव्हे तर मुलांना हत्यारं विकत घेऊन त्यांना हत्यारं चालवायला शिकवा, असं देखील विनीत अग्रवाल शारदा म्हणाले.

जोपर्यंत कुटुंब नियोजनासंदर्भात नियम बनवला जात नाही तोपर्यंत आपण हम दो हमारे पाचचा संकल्प केला पाहिजे. यावेळेस शारदा यांनी सरकारलाही आवाहन करताना, आमचे दोन त्यांचेही दोनचा नियम करावा किंवा हम दो हमारे पाचचा संकल्प करावा, असं म्हटलं आहे. या पाच मुलांच्या शिक्षणाविषयी, भविष्याविषयी सांगितलं. पाच मुलांपैकी सर्वाधिक शिकलेल्या मुलाला राजकारणात पाठवावं. एका मुलाला मान, प्रतिष्ठेचं संरक्षण करण्यासाठी हत्यार खरेदी करुन द्यावं आणि ते हत्यार चालवायला शिकवावं. याशिवाय, एका मुलाला भारतीय लष्करात पाठावावं. तर एकाला व्यापारी आणि दुसऱ्या एका मुलाला आयएएस किंवा पीसीएस बनवून भारतीयांच्या सेवेसाठी सक्षम करावं, असं देखील विनीत अग्रवाल शारदा त्यांच्या भाषणात म्हणाले.

- Advertisement -

विनीत अग्रवाल शारदा यांनी त्यांच्या भाषणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी रामायणाचाही संदर्भ दिला. महाराज दशरथ यांना चार मुलं होती. महाराज दशरथ यांना चार मुलं नसती तर रावणाचे राज्य संपुष्टात आलं नसतं. आता देशाला देखील हम दो हमारे पाचची गरज आहे, असं विनीत अग्रवाल शारदा म्हणाले.


हेही वाचा – महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद: तोपर्यंत वादग्रस्त भूभाग केंद्रशासित करा – मुख्यमंत्री

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -