घरमुंबईलोकलला मेट्रोचा पर्याय; मुंबई मेट्रो लाईन २ ए आणि ७ मुंबईत दाखल

लोकलला मेट्रोचा पर्याय; मुंबई मेट्रो लाईन २ ए आणि ७ मुंबईत दाखल

Subscribe

देशातील पहिली भारतीय बनावटीची चालकविरहीत मेट्रो

मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकलवरचा आता भार कमी होण्यास मदत होणार आहे. कारण लाखो मुंबईकर ज्या प्रतिक्षेत होते, अशी मुंबई मेट्रो लाईन २ ए आणि लाइन ७ अखेर मुंबईत दाखल झाली आहे. त्यामुळे आता मुंबईकरांची प्रतिक्षा संपली आहे. भारतीय बनावटीच्या पहिल्या मेट्रो कोचचे आज चारकोप मेट्रो डेपो संचलन येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

या मेट्रोची चाचणी येत्या मार्चपासून सुरू होणार असून मे महिन्यापासून मेट्रो प्रवाशांकरता सुरू केली जाणार आहे. आज या मेट्रोच्या अनावरण कार्यक्रमासह नियंत्रण केंद्र, ग्रहण उपकेंद्राचे उदघाटन आणि ब्रँडिंग मॅन्युअलचे प्रकाशन ही केले गेले. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, महापौर किशोरीताई पेडणेकर, आमदार सुनील प्रभू, कपिल पाटील, विलास पोतनीस आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

मेट्रोची खास वैशिष्ट्य

देशात पहिली अशी भारतीय बनावटीची मेट्रो तयार करण्यात आली आहे. जी मेट्रो चालकविरहीत असणार आहे. विशेष म्हणजे ऊर्जा वाचविण्यासाठी पुनरुत्पादक ब्रेक सिस्टम, प्रत्येक बाजूला चार दरवाजे असलेली स्टेलनेस स्टील बॉडी आणि खास बाब म्हणजे प्रवाशांना कोचमधून त्यांच्या सायकलसह प्रवास करता येणार आहे.

- Advertisement -

मेट्रो लाइन २ ए

दहिसर पूर्व ते डिएन नगरला जोडणाऱ्या १८.५ किमी लांबीच्या मेट्रो लाईन २ ए च्या बांधकामासाठी ६ हजार ४१० कोटी रुपये खर्च आला आहे. या मार्गावर एकूण १६ स्थानके असणार असून यामध्ये आनंद नगर, रुषी संकुल, आयसी कॉलनी, एकसर, डॉन बॉस्को, शिंपोली, महावीर नगर, कामराज नगर, चारकोप, मालाड मेट्रो, कस्तुरी पार्क, बांगूर नगर, गोरेगाव मेट्रो, आदर्शनगर, शास्त्री नगर आणि डीएन नगरचा समावेश असणार आहे.

मेट्रो लाईन ७

अंधेरी पूर्व आणि दहिसर पूर्वेला जोडणारी १६.४७५ किमी लांबीची मेट्रो लाईन ७ ही ६ हजार २०८ कोटी रुपये खर्चून बांधली गेली आहे. या मार्गावर एकूण १३ स्थानके असणार आहेत. यामध्ये दहिसर (पूर्व), ओवरीपाडा, नॅशनल पार्क, देवीपाडा, मागाठाणे, महिंद्रा अँड महिंद्रा, बाणडोंगरी, पुष्पा पार्क, पठाणवाडी, आरे, महानंद, जेव्हीएलआर जंक्शन, शंकरवाडी, अंधेरी (पूर्व) या स्थानकांचा समावेश असणार आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -