घरमनोरंजनसुपरस्टार महेश बाबूंच्या 'मेजर'ची तारीख ठरली

सुपरस्टार महेश बाबूंच्या ‘मेजर’ची तारीख ठरली

Subscribe

शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट

२६/११ च्या ताज हॉटेलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित ‘मेजर’ या चित्रपटाची तारीख अखेर ठरली आहे. हा चित्रपट २ जुलै २०२१ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. दक्षिणेचा सुपरस्टार महेश बाबू याच्या प्रॉडक्शन हाऊसने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. महेश बाबूने या चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर केले असून त्याची डेट रिलीज केली आहे. या चित्रपटात अदिवी संदीप उन्नीकृष्णनसह भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट शशी किरण यांनी दिग्दर्शित केला आहे. अदिवीसह शोभिता धुलीपाला आणि सई मांजरेकर या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.अभिनेत्री शोभिता धूलिपालाने या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahesh Babu (@urstrulymahesh)

- Advertisement -

यापूर्वी या चित्रपटाचं एक पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं ज्यामध्ये आदिवि शेष मेजरच्या लूकमध्ये दिसला होता. या चित्रपटाविषयी आदिवीने एका मुलाखतीत सांगितले की, संदीप उन्नीकृष्णन यांच्या कथेनं मी खूप प्रभावित झालो. मला आठवतंय की मी त्यांचा एक फोटो पाहिला होता जो सर्व चॅनेल्सवर दाखवला गेला होता. त्यांचा चेहरा पाहून ते मला माझ्या कुटुंबाचा भाग असल्यासारखे वाटले. नंतर मला कळलं की हे मेजर संदीप उन्नीकृष्णन आहेत ज्यांनी देशासाठी प्राण दिलेत.

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -