घरमुंबईमुंबईमध्ये येत्या मंगळवार-बुधवारी 'या' भागात पाणी कपात  

मुंबईमध्ये येत्या मंगळवार-बुधवारी ‘या’ भागात पाणी कपात  

Subscribe

जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असल्याने पाणी कपात होणार आहे.

रावळी येथील उच्च स्तरीय जलाशय येथे जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असल्याने येत्या मंगळवार आणि बुधवारी मुंबईत काही ठिकाणी पाणी कपात केली जाणार आहे. मंगळवार ९ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजल्यापासून दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असून बुधवार १० फेब्रुवारीच्या रात्री १० वाजेपर्यंत हे काम चालणार आहे. त्यामुळे या कालावधीत एफ उत्तर विभागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. तर एफ दक्षिण भागात कमी दाबाने पाणी येईल. पाण्याची समस्या लक्षात घेता नागरिकांनी आदल्या दिवशी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

येत्या ९ आणि १० फेब्रुवारीला महापालिकेच्या ‘एफ/उत्तर’ विभागातील रावळी येथील उच्च स्तरीय जलाशय येथे ९०० मिमी जलवाहिनीच्या गळती दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम ९ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजल्यापासून सुरु होणार आहे. १० फेब्रुवारीला रात्री १० वाजेपर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

  • या भागात पाणी पुरवठा पूर्ण बंद असणार
    दादर, माटुंगा, चुनाभट्टी, किंग सर्कल, सायन, अँटॉप हिल
  • या भागात कमी दाबाने येणार पाणी
    दादर, नायगाव, शिवडी, लालबाग, परळ
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -