घरदेश-विदेशTool kit प्रकरणातील बीड कनेक्शन...

Tool kit प्रकरणातील बीड कनेक्शन…

Subscribe

थेट खलिस्तानवाद्यांच्या संपर्कात असल्याचा आरोप

शेतकरी आंदोनलासंदर्भात स्वीडनमधील पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हीने शेअर केलेल्या टूल किट प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून देशभरात कारवाई सुरु आहे. दिशा रवीसह आता आणखी दोन जणांविरुद्ध अटक वॉरंट काढण्यात आले आहे. याप्रकरणात आता बीड शहरातील शंतनु शिवलाल मुळूक या तरुणाचेही नाव पुढे आले आहे. शंतनुच्या चौकशीसाठी दिल्ली पोलिसांची टीम बीडमध्ये दाखल झाली आहे. दिल्ली पोलिसांनी शंतनुच्या घराची झाडाझडती घेतली असून शंतनूच्या आई वडिलांचीही चौकशी सुरु आहे. त्याचप्रमाणे शंतनुचे बँक खातेही तपासले जात आहे.

मूळचे बीड जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या शंतनू मुळूक यांचं नावही टूलकिट प्रकरणात समोर आलं आहे. शंतनू याच्यावर टूलकिट तयार करण्याबरोबरचं खलिस्तानवादी समर्थक गटाच्या संपर्कात असल्याचे आरोप आहे. बीडमधील चाणक्यपुरी भागात राहणारा शंतनु शिवलाल मुळूक यांचा मोठा मुलगा आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्याने शंतनुच्या नावाची बदनामी केली जात असून त्याचा गुन्हा दाखल केला असल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. शंतनू हा बी ई मॅकेनिक असून त्यांने अमेरिकेत MS ची पदवी घेतली आहे. तो पर्यावरण संवर्धनासंदर्भातील कार्यात राष्ट्रीय पातळीवर काम करतो. शेतकऱ्यांप्रती असलेल्या भावनेपोटी तो सोशल मिडियावरुन शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत होता. शंतनुच्या कुटुंबीयांकडे त्याचबद्दल पोलिसांनी चौकशी केली आहे. शंतनू औरंगाबाद शहरात कामाला आहे. काही कामानिमित्ताने ते पुण्याला गेले होता. त्यानंतर कुटुंबियांशी त्याचा कोणताही संपर्क झालेला नाही. असे कुटुंबियांचे म्हणणे आहे. शंतनूने दिल्ली पोलिसांच्या अटक वॉरंटवर मुंबई उच्च न्यायालाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. याच अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. यावेळी सतेज जाधा हे त्यांचे वकिल त्याची बाजू मांडणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा- Allahabad Bank खातेदारांना ‘हे’ नवीन नियम लागू

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -