घरमनोरंजनकंगनाच्या ट्विटद्वारे झाला नाही हिंसाचार, खंडपीठात गुन्हा रद्द करण्याची मागणी

कंगनाच्या ट्विटद्वारे झाला नाही हिंसाचार, खंडपीठात गुन्हा रद्द करण्याची मागणी

Subscribe

मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी कंगना व तिची बहीण रंगोलीला समन्स बजावले आहे.

कंगनाच्या ट्विटद्वारे काहीच चुकीचे झाले नाही किंवा कोणताही गुन्हा घडलेला नाही, असा दावा करत अभिनेत्री कंगना रनौतवरील गुन्हा मुंबई पोलिसांनी रद्द करावा, अशी विनंती उच्च न्यायालयाला केली. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी २६ फेब्रुवारी रोजी होणार असून, कंगना व तिची बहीण रंगोली यांना दिलेले अंतरिम संरक्षण तोपर्यंत कायम ठेवले जाणार आहे.

माझ्या ट्विटरवर लोकांनी प्रतिक्रिया दिली नाही. त्याचे कोणत्याही हिंसाचारात रूपांतर झाले नाही. त्यामुळे मला कोणतीही शिक्षा होऊ शकत नाही, असे कंगनाचे वकील रिझवान सिद्दिकी यांनी न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठाला सांगितले. वांद्रे दंडाधिकाऱ्यांनी कंगना व तिची बहीण रंगोली हिच्याविरुद्ध फौजदारी कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी दोघींना समन्स बजावले. या कार्यवाहीला दोघींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. गुन्हा नोंदविण्याचा आदेश देताना वांद्रे न्यायालयाने सारासार विचार केला नाही. जे कलम लावण्यात आले आहे, त्याअंतर्गत कोणताच गुन्हा केलेला नाही.

- Advertisement -

म्हणून कंगनावर गुन्हा दाखल

पोलीस कंगना रनौत विरोधात तक्रार दाखल करुन घेत नसल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले होते. अभिनेत्री कंगना रनौत वारंवार बॉलिवूडची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक ठिकाणी ती बॉलिवूडच्या विरोधात बोलते. यानंतर वांद्रे न्यायालयाने कंगना रनौत हिच्यावरोधात दोन समाजात द्वेष पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

कंगना रनौतने बॉलीवूड इंडस्ट्रीवर टीका करताना मुस्लिमांचे प्राबल्य असल्याचे वक्तव्य केले होते. मी झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवून हे इस्लामी प्राबल्य मोडून काढले, असे तिने म्हटले आहे. दरम्यान, व्यवसायाने वकील असलेल्या मुन्नावर अली आणि साहिल अशरफ सैय्यद यांनी वांद्रे कोर्टात कंगनाविरुद्ध याचिका दाखल केली होती.

- Advertisement -

हेही वाचा – Lockdown : मुंबईत पुन्हा लॉकडाऊन? ‘या’ तारखेनंतर घेतला जाणार निर्णय 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -