घरमहाराष्ट्रTool Kit: टूलकिट प्रकरणी शंतनू मुळूकला अटकेपासून दिलासा; १० दिवसांचा जामीन मंजूर

Tool Kit: टूलकिट प्रकरणी शंतनू मुळूकला अटकेपासून दिलासा; १० दिवसांचा जामीन मंजूर

Subscribe

टूलकिट प्रकरणी शंतनू मुळूकला अटकेपासून दिलासा मिळाला आहे. शंतनू मुळूकला १० दिवसांचा अंतरिम जामीन मिळाला आहे. औरंगाबाद खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. या प्रकरणातील निकिता जेकबबाबतचा निर्णय उद्या होणार आहे. दिशा रवी, निकिता जेकब आणि शंतनू या तिघांनी ‘टूलकिट’ तयार केल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर ठेवला आहे. त्यांच्याविरोधात अटकपूर्व वॉरंट जारी केलं आहे.

शंतनू मुळूक यांनी औरंगाबाद खंडपीठाकडे अंतरिम जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. आज सुनावणी पार पडली. खंडपीठाने १० दिवसांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला. वरिष्ठ न्यायालयापर्यंत जामीन मागता यावी यासाठी औरंगबाद खंडपीठाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मात्र, टूलकिट प्रकरणातील निकिता जेकब हिच्या जामीनाबाबतचा निर्णय उद्या होणार आहे. मुंबई खंडपीठामध्ये निकिता जेकबच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे.

- Advertisement -

केंद्राने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनासंदर्भात पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग यांनी एक ‘टूलकिट’ शेअर केलं. या प्रकरणी तिच्यावर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर या प्रकरणात दिशा रवी, निकिता जेकब आणि बीडमधील पर्यावरणवादी कार्यकर्ता शंतनू मुळूक यांचं देखील नाव समोर आलं. दिशा रवी, निकिता जेकब आणि शंतनू या तिघांनी ‘टूलकिट’ तयार केल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर ठेवला आहे. हे तिघे खलिस्तानींच्या संपर्कात होते. या प्रकरणी दिशा रवी हिला पोलिसांनी अटक केली आहे. तर निकिता जेकब आणि शंतनू मुळूक या दोघांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे.


हेही वाचा – विदेशी षडयंत्रात शिवसेनेचे हस्तक; राम कदमांचा आरोप

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -