घरट्रेंडिंगदिव्यांग मराठी तरुणाची जिद्द, सर केला लिंगाणा किल्ला

दिव्यांग मराठी तरुणाची जिद्द, सर केला लिंगाणा किल्ला

Subscribe

चैतन्यचा अभिनास्पद आणि प्रेरणादायी प्रवास

हल्ली अनेक तरुण तरुणींमध्ये ट्रेकिंगचे प्रचंड वेड असलेले पहायला मिळत आहे. मात्र खरंच जिद्दीने ट्रेकिंग करणारे आणि मस्ती म्हणून जाणारे ट्रेकर्स वेगळे. ट्रेकिंगसाठी अनेक किल्ले आहेत. त्यातील एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे लिंगाणा किल्ला. भल्या भल्यांना हा किल्ला सर करणे शक्य होत नाही. अनेक तरुण तरुणी किल्ल्यावर अर्धापर्यंत जाऊन धकतात. मात्र आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर एका दिव्यांग तरुणाने लिंगाणा किल्ला सर करुन दाखवला आहे. लिंगाणा हा किल्ला चढणे अत्यंत कठीण आहे. मात्र या तरुणाने हा किल्ला यशस्वीरित्या पार केला आहे. लिंगाणा डोंगरावर असलेली शिखरावरची गुहेजवळ जाऊन त्याने भारताचा तिरंगा फडकवला. दोन दिवसात त्याने हा किल्ला सर केला.

अहमदनगर येथे राहणारा चैतन्य कुलकर्णी असे या तरुणाचे नाव आहे. चैतन्य २०१४ साली ६० फुटांच्या नारळाच्या झाडावरुन खाली पडला होता. या अपघातात चैतन्याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली. चैतन्यला ट्रेकिंगची विशेष आवड होती. लिंगाणा ट्रेक करण्यासाठी चैतन्यने अनेक ट्रेकिंग ग्रुपशी संवाद साधला होता. मात्र त्याच्या दिव्यांग परिस्थितीमुळे त्याला कोणीही ट्रेकिंगसाठी घेत नव्हते. बारामतीतील अनिल वाघ, अमोल बोरकर आणि संदीप कसबे यांच्या ट्रेकिंग ग्रुपने मात्र चैतन्यला संधी दिली आणि चैतन्यने त्याला मिळालेल्या संधीचे सोने केले. १२ फेब्रुवारीला त्याने लिंगाणा किल्ला चढायला सुरुवात केली. मध्ये थांबत थांबत १३ फेब्रुवारीला ५ तासांत चैतन्य लिंगाणा किल्ल्याच्या गुहेपर्यंत पोहचला.

- Advertisement -

लिंगाणा सर करत असताना चैतन्यला अनेक अडचणी आल्या मात्र त्याने त्याच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर लिंगाणा सर केला. बऱ्याचदा तापलेल्या उन्हामुळे चैतन्यला ट्रेक करणे अशक्यही झाले होते. मात्र तो थांबला नाही. याआधी चैतन्यने तब्बल तीन वेळा कळसूबाई शिखरही पार केला आहे. एखादी गोष्ट मनाशी पक्की ठरवली आणि त्याच्या मागे धावत राहिलो की ती गोष्ट सर करणे कठिण नसते हे चैतन्यने दाखवून दिले आहे. दिव्यांग असला तरी त्याने त्याच्या मोठ्या जिद्दीने लिगांना किल्ला सर केलाच. त्याचा हा प्रवास अनेकांना अभिनास्पद आणि प्रेरणा देणार ठरला आहे.


हेही वाचा – अरे व्वा! ‘इथं’ मिळतंय फ्रीमध्ये पेट्रोल पण ‘हे’ करावं लागणार

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -