घरपालघरसार्वजनिक ग्रंथालयातील अभ्यासिकेची वेळ वाढणार

सार्वजनिक ग्रंथालयातील अभ्यासिकेची वेळ वाढणार

Subscribe

 विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी

वसई विरार शहर महापालिकेच्या सर्व सार्वजनिक ग्रंथालयातील अभ्यासिकेची वेळ वाढवण्याची सूचना आयुक्तांनी संबंधित ग्रंथालयांना दिलेल्या असल्याने आता अभ्यासिकेत अभ्यास करण्यासाठ येणाऱ्या मॅनेजमेंट, सीए, एलएलबी, एमबीए, एमबीबीएस, इंजिनीअर, एमपीएससी, युपीएससी  यांसारख्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांना त्याचा फायदा होणार आहे.

कोरोना महामारीमुळे  राज्यातील सर्व सार्वजनिक ग्रंथालये पूर्ण वेळ बंद ठेवण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले होते. त्या अनुषंगाने वसई विरार शहर महापालिकेची सार्वजनिक वाचनालये बंद होती. लॉकडाउन संपल्यानंतर  सार्वजनिक ग्रंथालये सुरु करण्यात आली. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शासनाने परिपत्रकासोबत काही मार्गदर्शन सूचना वाचनालयांना दिलेल्या होत्या. त्यामध्ये ग्रंथालयाची वेळ सकाळी ८.०० ते साय. ५.०० इतकी असावी, असे नमूद करण्यात आलेले होते.

- Advertisement -

लॉकडाऊननंतर शासनाकडून अनेक बाबींमध्ये शिथिलता करण्यात आली. शाळा व महाविद्यालये सुरु करण्यात आली. परिणामी अभ्यासिकेत अभ्यास करण्यासाठी येणाऱ्या मॅनेजमेंट, सीए, एलएलबी, एमबीए, एमबीबीएस, इंजिनीअर, एमपीएससी, युपीएससी  यांसारख्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांची वाढ होऊं लागली. त्यातच शासनाकडून अनेक विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यामुळे आधीच लॉकडाऊनच्या कालावधीत अभ्यास न झाल्यामुळे आणि अचानक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. त्यातच शासनाच्या आदेशामुळे अभ्यासिकेची वेळ ही साय. ५.०० वाजेपर्यंत करण्यात आलेली होती. त्यामुळे अभ्यासिकेची वेळ वाढवावी यासाठी विद्यार्थांनीमाजी महापौर नारायण मानकर यांची भेट घेऊन त्यांना अभ्यासिकेची वेळ वाढवण्यासाठी विनंती केली. त्यानंतर माजी महापौर नारायण मानकर व उपमहापौर प्रकाश रॉड्रिग्स ह्यांनी महापालिकेत पाठपुरावा करून आयुक्त, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त, सहा-आयुक्तांची भेट घेऊन अभ्यासिकेची वेळ वाढवून विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे यासंबंधी चर्चा  केली व लेखी स्वरूपात निवेदन दिले होते.

याची दखल घेऊन आयुक्त गंगाथरन डी. यांनी महापालिकेच्या सर्व ग्रंथालयांना अभ्यासिकेची वेळ वाढवून साय. ५.00 वरून रात्री ९.०० वाजेपर्यंत करण्यात यावी असे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळाल्यामुळे विद्यार्थी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -