घरक्रीडाAustralian Open : नाओमी ओसाकाला जेतेपद; दुसऱ्यांदा जिंकली ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा 

Australian Open : नाओमी ओसाकाला जेतेपद; दुसऱ्यांदा जिंकली ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा 

Subscribe

ओसाकाने जेनिफर ब्रेडीवर सरळ सेटमध्ये मात केली.

जपानची स्टार टेनिसपटू नाओमी ओसाकाने ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकावले. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात ओसाकाने अमेरिकेच्या जेनिफर ब्रेडीवर ६-४, ६-३ अशी सरळ सेटमध्ये मात केली. ओसाकाचे हे ऑस्ट्रेलियन ओपनचे दुसरे जेतेपद ठरले. याआधी तिने २०१९ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. तसेच २३ वर्षीय ओसाकाचे हे एकूण चौथे ग्रँड स्लॅम जेतेपद ठरले. तिने दोन वेळा अमेरिकन ओपन आणि आता दोन वेळा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली आहे. मागील वर्षी अमेरिकन ओपनमध्ये जेनिफर ब्रेडीने ओसाकाला अप्रतिम झुंज दिली होती. परंतु, शनिवारी झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात ब्रेडीला चांगला खेळ करता आला नाही.

अंतिम सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये ४-४ अशी बरोबरी होती. यानंतर मात्र ओसाकाने आपली सर्व्हिस राखत आणि ब्रेडीची सर्व्हिस मोडत हा सेट ६-४ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये मात्र ओसाकाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. त्यामुळे तिच्याकडे ४-० अशी आघाडी होती. यानंतर ब्रेडीने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. परंतु, ओसाकाने हा सेट ६-३ असा जिंकत सामनाही जिंकला.

- Advertisement -

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -