घरमुंबईFact Check: मास्क नसल्यास मुंबई पोलीस १००० नाही तर घेणार २०० रुपये...

Fact Check: मास्क नसल्यास मुंबई पोलीस १००० नाही तर घेणार २०० रुपये दंड

Subscribe

मुंबईत कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने विना मास्क फिरणाऱ्यांवर मुंबई महानगरपालिकेकडून कारवाई बडगा उगारला जात आहे. एवढे असूनही अनेक नागरिक विना मास्क फिरताना दिसत आहे. यामुळे राज्य सरकारने विना मास्क फिरणाऱ्यांवर आता मुंबई पोलीसांनाही कारवाईचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांना नागरिकांना मास्क घालण्याचे आवाहन करत विना मास्क फिरल्यास २०० रुपये दंड होऊ शकतो असे जाहीर केले आहे. मात्र सोशल मिडियावरून मुंबई पोलिसांच्या नावे अनेक बनावट मॅसेज व्हायरल होत आहेत. या व्हायरल मॅसेजमध्ये मुंबई पोलीस मास्क न घातल्यास १००० रुपये दंड वसुल करतील असे म्हटले आहे . मात्र मुंबई पोलिसांनी पुन्हा एक नवे ट्विट करत या बातम्यांवर माहिती खोटी असल्याचे जाहीर केले आहे.

- Advertisement -

मुंबई पोलीसांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत , फेकन्यूज पसरवणारे पुन्हा परतेत. यावेळी फेकन्युज पसरवणारे ठग मास्क न लावल्यास १००० रुपये दंड होऊ शकतो असा दावा करत आहेत. परंतु पैशातून सुरक्षेमध्ये तडजोड झाल्यास भरपाई निघू शकत नाही. त्यामुळे मास्क न वापरल्यास केवळ २०० रुपये आकरले जाणार आहेत. असे लिहिले आहे. मुंबई पोलिसांच्या नावे फिरणारे मॅसेज खोटे आहेत. मुंबई पोलिसांकडूनही सोशल मिडियाच्या माध्यमातून मास्क घालण्याचे आवाहन करत आहेत.

- Advertisement -

याआधीही मुंबई पोलीसांनी ट्विटरवरून, मुंबईकरांनो, विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींकडून दंड आकारण्याचे अधिकार आता मुंबई पोलीसांकडे देखील आहेत. आजपर्यंत आपल्याच सुरक्षिततेकरिता हेल्मेट/सीटबेल्ट न वापरल्याबद्दल आम्ही आपणास दंड केला. त्याचप्रमाणे ही कारवाई देखील आपल्या सुरक्षिततेसाठी आम्ही करू. असे म्हटेल होते. त्यामुळे मुंबई पोलिस आणि पालिका आता अॅक्शन मोडवर आली असून मास्क न वापरणाऱ्यांची आता खैर नाही.


हेही वाचा- मुख्यमंत्र्यांचे अल्टिमेटम; पोलिस, महापालिकेची कारवाई सुरु

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -