घरक्राइमधक्कादायक! कंडक्टरने बेल वाजवण्याच्या दोरीने बसमध्येच घेतला गळफास

धक्कादायक! कंडक्टरने बेल वाजवण्याच्या दोरीने बसमध्येच घेतला गळफास

Subscribe

नांदेडमधील माहूर आगारातील एक कंडक्टरने बेल वाजवण्याच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने मराठवाड्यात खळबळ उडाली आहे. संजय संभाजी जानकर (५३) असं गळफास घेणाऱ्या कंडक्टरचं नाव आहे. आत्महत्या केलेल्याचं आज सकाळी उघडकीस आलं. सफाई कर्मचारी लक्ष्मीबाई व्यवहारे या सफाई करत असताना त्यांना कंडक्टर संजय जानकर दोरीला लटकलेल्या अवस्थेत दिसले. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तथापि, संजय जानकर यांना दोन मुले पत्नी असा परीवार आहे. जानकर हे वाघी, नांदेड येथील रहिवासी होते.

संजय संभाजी जानकर हे माहूर आगारात गेली कित्येक वर्षे कंडक्टर म्हणून काम करत आहेत. मात्र, त्यांनी बेल वाजवण्याच्या दोरीने एस .टी.बस क्रमांक एम.एच. २० बी.एल .४०१५ मध्ये गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येची माहिती कळताच आगारातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. तथापि, आत्महत्या करण्यापूर्वी जानकर यांनी चार पानांची सुसाईड नोट लिहून ती कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुप शेअर केली. या सुसाईड नोटमध्ये तिकीट मशीनमध्ये बिघाड झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

- Advertisement -

काय लिहिलं सुसाईड नोटमध्ये?

संजय जानकर यांची दोन दिवसांपूर्वी माहूर – यवतमाळ, माहूर – उमरखेड या मार्गावर ड्यूटी होती. या दरम्यान, एसटीमध्ये माहूरवरुन महागावला जाण्यासाठी तीन फुल्ल आणि एक हाफ तिकीट असलेले प्रवासी चढले. मात्र तिकीट मशीमध्ये बिघाड असल्याने साडेतीन ऐवजी एकच तिकीट प्रिंट झालं होतं. याच घटनेचा उल्लेख त्यांनी सुसाईड नोटमध्ये केला आहे.

“ईटीआयएम मशीन नादुरुस्त असल्यानं वाहकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. बिघाड असलेल्या मशिनद्वारे वाहक आपली कामगिरी बजावत आहेत. खोट्या अहवालाने आता मला निलंबित केलं जाईल नातेवाईकांसह आणि रा.प.म. कर्मचाऱ्यांत माझी बदनामी होईल, प्रत्येकजण मला चोर समजेल. त्यामुळे माझी बदनामी होईल. आगारात सदरची मशीन चेक केली जाईल, बिघाड दुरुस्त करून खोटा अहवाल दिला जाईल आणि मला दोषी ठरवलं जाईल. मशीन योग्य असती तर तिकीट योग्य निघालं असतं, माझी बदनामी झाली नसती. माझ्या आत्महत्येला प्रशासन जबाबदार आहे,” असं जानकर यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – झटपट पैसे कमावण्याच्या नादात महिला उतरली ड्रग्जच्या धंद्यात, पोलिसांनी जप्त केला ५० लाखांचा एमडी


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -