घरमहाराष्ट्रचिकनमध्ये पालीचं शेपूट सापडले; जाब विचारताच बाऊन्सरने धोपटले!

चिकनमध्ये पालीचं शेपूट सापडले; जाब विचारताच बाऊन्सरने धोपटले!

Subscribe

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल

आपण अनेकदा जेवणासाठी स्वच्छ हॉटेल, रेस्टॉरंटची निवड करतो. मात्र अशा हॉटेलमध्ये जरा किळसवाणा प्रकार दिसला तर आपला हिरमोड होतो. असाच काहीसा प्रकार कोल्हापूरातून समोर आला आहे. कोल्हापूरमध्ये खवय्यांनी मागवलेल्या मासंहारी जेवणात मेलेली पाल दिसली आणि खवय्यांचा राग अनावर झाला. या प्रकारात जेवणार पाल सापडल्यावर त्याचा जाब विचारणाऱ्या तरुणांना एका हॉटेलमध्ये जबर मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला.

कोल्हापूर शहरातील राजेंद्रनगर परिसरामध्ये एका हॉटेलमध्ये शनिवारी रात्री हा प्रकार घडला. यामुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री नऊच्या सुमारास कोल्हापूरातील काही तरूण जेवणासाठी राजेंद्रनगर परिसरातील एका हॉटेलमध्ये गेले होते. त्यांनी शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ मागवले. त्यापैकी शाकाहारी पदार्थात मेलेली पाल सापडली. याबाबत हॉटेल व्यवस्थापकाला त्या तरुणांनी जाब विचारायला सुरुवात केली.

- Advertisement -

जाब विचारताच बाऊन्सरने धोपटले!

हा सगळा शाब्दिक वाद तरूणांनी शूट केला. याप्रकारानंतर राग आल्याने हॉटेलमधील व्यवस्थापक, तेथील बाऊन्सर त्याचबरोबर वेटर यांनी त्या तरुणांना बेदम मारहाण केल्याची ही माहिती मिळतेय. या मारहाणीमध्ये जखमी झालेल्या तरुणांना कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर जखमी तरुणांच्या नातेवाईकांनी राजारामपुरी पोलीस स्टेशनसमोर मोठी गर्दी केली. तरुणांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीदेखील नागरिकांकडून करण्यात आली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हॉटेलमधील मेलेल्या पालीचा हा किळसवाणा व्हिडिओ बघता-बघता कोल्हापूरमधील अनेक तरुणांच्या मोबाईलवर व्हायरल होताना दिसतोय. या प्रकारानंतर राजारामपुरी पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूच्या नागरिकांनी कोणतीही तक्रार न दाखल करता आपापसात हा वाद मिटवला असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -