घरमुंबईपूजा चव्हाण प्रकरणी ५ कोटींवरुन कुटुंबीयांत आरोप-प्रत्यारोप

पूजा चव्हाण प्रकरणी ५ कोटींवरुन कुटुंबीयांत आरोप-प्रत्यारोप

Subscribe

पैशापोटी स्वतःच्या मुलीची किंमत केल्याचा आरोप

पूजाच्या आई-वडिलांना ५ कोटी रुपये पुरविल्याने पूजाचे आई-वडिल प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा पुजाच्या आजीने केला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात ऑडिओ क्लिपमुळे चर्चेत असलेले वनमंत्री संजय राठोड यांनी रविवारी २८ फेब्रुवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे राजीनामा दिलाय. तसेच पूजा चव्हाण प्रकरणात पारदर्शक चौकशी व्हावी असेही संजय राठोड यांनी राजीनामा देताना म्हटले आहे. तसेच पूजा चव्हाणच्या आई-वडीलांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणाची चौकशी व्हावी असे त्यांनी म्हटले आहे. तसे पत्रही पूजा चव्हाणच्या आई-वडीलांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. पूजा चव्हाण प्रकरणात नवे-नवे फोटो बाहेर येत असल्यामुळे या प्रकरणाच्या चर्चेला दिवसेंदिवस उधाण आले आहे. परंतु पूजाच्या चुलत आजीने केलेल्या वक्तव्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण प्राप्त झाले आहे.

काय म्हटले आहे पूजाच्या आजीने

पूजा चव्हाणच्या चुलत आजीने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. पूजाला न्याय मिळवून देण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत आहे. परंतु पूजाच्या आई-वडिलांना वनमंत्री संजय राठोड यांनी ५ कोटी रुपये दिले यामुळे ते गप्प बसले आहेत. त्यांच्याकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांनी या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी केली. परंतु त्यांनी पैशापोटी स्वतःच्या मुलीची किंमत केली असल्याचे पूजाच्या आजीने म्हटले आहे. पूजाच्या तपासावरुन आता नातलगांमध्येच आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असल्याचे पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

हेही वाचा : LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत २५ रूपयांनी पुन्हा वाढ


पूजावर अन्याय झाला तिचा घात झालाय परंतु पैशांच्या जोरावर हा अन्याय दडपण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे पूजाच्या आजीने म्हटले आहे. तर पूजाच्या आजीनेही मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी केली आहे. पूजा मानसिक तणावाखाली होती असे तिच्या वडिलांनी सांगितले आहे. वनमंत्री संजय राठोड यांनी पैसा पुरवला आहे. त्यामुळे आता तिच्या आई-वडिलांचा आवाज आता दडपला आहे. असे धक्कादायक वक्तव्य पूजाच्या आजीने केले आहे. दरम्यान संजय राठोड यांच्या पोहरादेवी शक्तिप्रदर्शनावेळी पूजाच्या आजीने वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -