घरमनोरंजनसुनिल शेट्टीच्या मुलाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

सुनिल शेट्टीच्या मुलाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

Subscribe

अहान शेट्टी याने नुकतेच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असून तो त्याच्या नवीन आगामी चित्रपट 'तडप' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अहान सोबत तारा सुतारिया ही देखील पाहायला मिळणार आहे.

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी चा मुलगा अहान शेट्टी याचे नुकतेच बॉलिवूडमध्ये पदार्पण झाले आहे. अहान हा त्याच्या नवीन आगामी चित्रपटातून झळकणार आहे. या चित्रपटाचे नाव तडप असून एका प्रेमकथेवर आधारित हा चित्रपट असणार आहे. तडप मध्ये अहान शेट्टी सोबत तारा सुतारिया ही सहकलाकार म्हणून पाहायला मिळणार आहे. ताराने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे.

अभिनेत्री तारा सुतारियाने ‘तडप’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले असून, एक लव्ह स्टोरी खूप साऱ्या इमोशनसोबत. साजिद नाडियादवालाची लव्हस्टोरी तडपमधील जादूचा अनुभव घ्या. हा चित्रपट २४ सप्टेंबर २०२१ ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे असे कॅप्शन दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by TARA💫 (@tarasutaria)

- Advertisement -

अहान हा बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत असल्यामुळे अभिनेता अक्षय कुमारनेही पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षयने तडपचे पोस्टर शेअर करताना, तुझ्यासाठी मोठा दिवस आहे. मला आजही आठवते की तुझे वडील सुनील शेट्टीचा पहिला चित्रपट बलवानचे पोस्टर आणि आज तुझ्या चित्रपटाचे पोस्टर प्रिसेंट करतो आहे. तडपचे पोस्टर शेअर करताना मला आनंद आणि गर्व वाटतो आहे. तडप २४ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अशी पोस्ट अक्षयने शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

- Advertisement -

यामुळे आता  ‘तडप’ या चित्रपटाची  प्रेमकथा आणि अहान शेट्टी याचा अभिनय पाहण्यासाठी सर्वच प्रेक्षक उत्सुक आहेत.


हे वाचा-  अभिनेता अतुल कुलकर्णींचा नवा क्राइम शो प्रेक्षकांच्या भेटीस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -