घरमुंबईकांजूरमार्ग कारशेड डेपोला राज्य सरकारची तत्वतः मान्यता

कांजूरमार्ग कारशेड डेपोला राज्य सरकारची तत्वतः मान्यता

Subscribe

०३१ पर्यंत आरे कारशेडमध्ये ४२ गाड्यांचा समावेश करता येईल अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली,

कांजूरमार्ग येथे मेट्रो-३ प्रकल्पाची कारशेड उभारण्यासाठी राज्य सरकारने तत्वत: मान्यता दिल्याची माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. कारशेडसाठी ही जागा योग्य असल्याचेही त्यांनी सांगितले. असज प्रश्नोत्तराच्या तासात एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. मेट्रो कारशेडसाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेला अहवाल सरकारला सादर करण्यात आला आहे. सन २०३१ पर्यंत आरे कारशेडमध्ये ४२ गाड्यांचा समावेश करता येईल. पुढील वाहतुकीसाठी पाच हेक्टर जागेची आवश्यकता लागेल. त्यासाठी एक हजारापेक्षा अधिक जुनी झाडे तोडावी लागतील, असे शिंदे यांनी सांगितले.

गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात आरे कारशेडचा मुद्दा चांगलाच गाजला होता. आरेतील जंगल तोडून कारशेड करण्याला पर्यावरणवाद्यांचा विरोध होता. मात्र, तत्कालीन फडणवीस सरकारने पर्यावरणवादांचा विरोध झुगारत एका रात्रीत कारशेडसाठी आवश्यक असलेली सर्व झाडे तोडून टाकली होती. त्यामुळे आरे आंदोलन आणखीनच चिघळले होते.महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्यात आली होती.

- Advertisement -

हेही वाचा- अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ; उद्या हक्कभंग समितीसमोर हजर राहण्यासाठी समन्स

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -