घरमहाराष्ट्रमुंबई ते साईनगर शिर्डी दरम्यान अतिजलद विशेष गाड्या धावणार

मुंबई ते साईनगर शिर्डी दरम्यान अतिजलद विशेष गाड्या धावणार

Subscribe

या गाड्या ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड आणि कोपरगाव या स्थानकांवर थांबणार आहेत.

मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी विशेष गाड्या सुरु केल्या आहेत. मुंबई – साईनगर शिर्डी दरम्यान साप्ताहिक अतिजलद विशेष गाड्या चालू करण्यात येणार. दरम्यान, ५-०३-२०२१ पासून शुक्रवारी आणि शनिवारी या अतिजलद गाड्या दादरहून सोडण्यात येणार आहेत. या गाड्या ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड आणि कोपरगाव या स्थानकांवर थांबणार असून यामध्ये १ वातानुकुलीत द्वितीय, २ वातानुकुलीत तृतीय आणि ७ शयनयान, ७ द्वितीय आसन श्रेणी याची सोय असणार आहे.

दरम्यान, पुढील सूचना मिळेपर्यंत ०२१४७ ही अतिजलद विशेष रेल्वे ५-०३-२०२१ पासून दादर येथून सुटणार आहे. ही रेल्वे दर शुक्रवारी रात्री ९.४५ वाजता सुटणार असून साईनगर शिर्डी येथे दुसर्‍या दिवशी दुपारी ०३.४५ वाजता पोहोचणार आहे. तर ०२१४८ ही अतिजलद विशेष रेल्वे ६-०३-२०२१ पासून साईनगर शिर्डी येथून दर शनिवारी सकाळी ०७.२५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दादरला दुपारी ०१.२५ वाजता पोहोचेल.

- Advertisement -

पूर्णपणे राखीव असलेल्या ०२१४७/०२१४८ या विशेष गाड्यांचे बुकिंग सामान्य भाडे दराने ३-३-२०२१ पासून सर्व ऑनलाइन आरक्षण केंद्रे आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावरुन बुकिंग करता येइल. उपरोक्त विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या सविस्तर वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in या वेबसाइटला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा. निश्चित तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येणार आहे.

कोविड-१९ संदर्भातील राज्य व केंद्र सरकारच्या सर्व नियमांचे पालन रेल्वे गाडीत व रेल्वे स्थानकांवर केले जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शिवसेना नेत्यांमुळे जीवाला धोका, मुंबईतील खटले हिमाचलमध्ये हलवा- कंगना रानौत

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -