घरमुंबईशाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण तयारीनेच करा; स्वयंसेवी संस्थांची मागणी

शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण तयारीनेच करा; स्वयंसेवी संस्थांची मागणी

Subscribe

संपूर्ण तयारी करूनच शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी या संस्थांनी केली आहे.

कोरोनामध्ये शाळाबाह्य झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी राज्य सरकारने शोधमोहीम हाती घेत सर्वेक्षण करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार राज्य सरकारने जाहीर केलेल्या अध्यादेशानुसार १ मार्चला सर्वेक्षण सुरू करण्याचे ठरले. परंतु, स्वयंसेवी संस्थांशी चर्चा केलेली नाही. सध्या सुरू झालेल्या अधिवेशनामध्ये शिक्षणमंत्री, शिक्षण विभागातील अधिकारी व्यस्त आहेत, अशा परिस्थितीत सर्वेक्षण कसे होणार असा प्रश्न स्वयंसेवी संस्थांनी उपस्थित केला. संपूर्ण तयारी करूनच शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी या संस्थांनी केली आहे.

…तोपर्यंत कोरोनाचा धोकाही कमी होईल

शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे अनेक वर्षांपासून सर्वेक्षण झालेले नाही. मात्र त्याची तयारी ढिसाळपणे करण्यात येत आहे. कोणत्याही पूर्वतयारीशिवाय होत असलेल्या सर्वेक्षणात किती मुले आढळतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या गंभीर विषयाची सरकारने थट्टा करू नये. त्यामुळे संपूर्ण सर्वेक्षण स्थगित करून शिक्षणमंत्र्यांनी स्वयंसेवी संस्थासोबत चर्चा करून सर्वेक्षण पद्धती नक्की करावी. सर्व शिक्षणाधिकारी यांनी त्या त्या जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थाशी चर्चा करावी. शिक्षकांच्या बैठका घ्याव्यात व शाळाबाह्य कोणाला म्हणावे हे निकष नक्की करावे. त्यानंतरच सर्वेक्षण करावे तोपर्यंत कोरोनाचा धोकाही कमी होईल, अशी सूचना सरकारने यापूर्वी नेमलेल्या नोडल पर्सन स्वयंसेवी संस्था व सर्वेक्षण समिती २०१५ मधील अधिकारी हेरंब कुलकर्णी यांनी केली आहे. त्याचबरोबर १६ स्वयंसेवी संस्थांनीही सर्वेक्षण ढिसाळघाईने न करता संपूर्ण तयारीनिशी करावे, अशी मागणी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -