घरक्रीडाखडतर परिस्थितीवर मात करत तो बनला कर्णधार

खडतर परिस्थितीवर मात करत तो बनला कर्णधार

Subscribe

आयुष्यात एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला, त्यासाठी अपार कष्ट केले तर कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते. याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे पिंपरी-चिंचवडचा युवा क्रिकेट खेळाडू पवन शाह. पवनने अथक प्रयत्न आणि अत्यंत हलाकीच्या परिस्थितीवर मात करत १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवले आहे.

आयुष्यात एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला, त्यासाठी अपार कष्ट केले तर कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते. याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे पिंपरी-चिंचवडचा युवा क्रिकेट खेळाडू पवन शाह. पवनने अथक प्रयत्न आणि अत्यंत हलाकीच्या परिस्थितीवर मात करत १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवले आणि आता त्याने आशिया चषकासाठी निवडलेल्या संघाच्या कर्णधार पदालाही गवसणी घातली आहे.त्याच्या या यशाने पिंपरी-चिंचवड शहराच्या नावलौकीकात भर पडली आहे.

पिंपरी-चिंचवडच्या वेंगसरकर अकादमीतून वयाच्या दहाव्या वर्षापासून पवनने क्रिकेटचा श्रीगणेशा सुरू केला. पहिल्याच वर्षी १४ वर्षे वयोगटातील क्रिकेट संघाविरोधात १० वर्षीय पवन मैदानात उतरला होता आणि त्यात त्याच्यातील प्रतिभावान खेळाडू प्रशिक्षक मोहन जाधव यांनी हेरला आणि त्याच्याकडे विशेष लक्ष द्यायला सुरूवात केली. पवनचे वडील हुकूम हे एका खासगी कंपनीत कामाला असून त्यांना महिन्याकाठी १२ ते १५ हजार रुपये मिळतात.पवनच्या क्रिकेटसाठी आणि घरातील आर्थिक चणचण भागवण्यासाठी पवनची मोठी बहीण ही कराटे क्लास घेत होती. क्रिकेट हा महागडा खेळ असून पवनच्या डायटचा खर्च देखील हजारोच्या घरात आहे,मात्र त्याला वडील हुकूम यांनी काहीच कमी पडू दिले नाही.

- Advertisement -

अनेकवेळा पैशांअभावी बॅट नसायची तर फाटलेले ग्लोज, खराब झालेले पॅड वापरले असल्याचे पवनने आपलं महानगर शी बोलताना सांगितले. श्रीलंका दौर्‍यावर पवनची निवड झाली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासारखी क्रिकेट किट पवनकडे नव्हती प्रशिक्षक मोहन जाधव यांनी पैसे जमा केले होते. मात्र किट खूप महाग होती अखेर प्रशिक्षक जाधव यांचे मित्रांच्या सहकार्याने एका कंपनीने त्याला जाहिरातीसाठी करारबद्ध केले.पहिल्या कसोटी सामन्यात दबाव असल्याने तो फार धाव करू शकला नाही,परंतु त्याने दुसर्‍या कसोटी सामन्यात ३२२ चेंडूत २८२ धाव करत त्याने बीसीसीआयचे लक्ष केंद्रित केले,यामुळेच त्याला कर्णधार पद मिळाले आहे. त्याला आता आपल्या नेतृत्वाखाली आशिया चषक जिंकायचा आहे. माजी कर्णधार महेंद्र धोनी हा त्याचा आवडता खेळाडू आहे. नेहमी जमिनीवर पाय ठेवून असले पाहिजे,ग्लॅमरला बळी पडू नये असा सल्ला प्रशिक्षक मोहन जाधव यांनी पवनला दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -