घरमनोरंजनबाबो, राखी सावंत झाली नागीण, व्हिडीओ व्हायरल

बाबो, राखी सावंत झाली नागीण, व्हिडीओ व्हायरल

Subscribe

राखीकडून कमेंटस करण्याचे आवाहन

बॉलिवूडची ड्रामेबाज अभिनेत्री राखी सावंत नेहमीच अंतरंगी सतरंगी फॅशनमुळे, विधानांमुळे चर्चेत असते. बिग बॉस १४ ची स्पर्धेक राहिलेल्या राखीने बिग बॉस १४ चा सीजन गाजवून टाकला. बिग बॉस १४ मधील राखीची नवीन फॅशन, तिचा अवतार प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होते. यातत राखीचा एक नवा अवतार पुन्हा चर्चेत आला आहे. राखीचा नवा अवतार पाहून सारेच आश्चर्य व्यक्त करत आहेत. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर धुमाकुळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये राखी ‘मै नागिन तू सपेरा’ या गाण्यावर ताल धरताना दिसत आहे. त्यामुळे राखीच्या हा नवा लूक पाहून चाहत्यांना हसू आवरणे कठीण होत आहे. परंतु हा व्हिडिओ खरा नसून मॉर्फ्ड केलेला व्हिडिओ आहे. ज्यामध्ये श्रीदेवींच्या चेहऱ्यावर राखीचा चेहरा लावण्यात आला आहे. परंतु तरीही ड्रामेबाज राखीच्या या व्हिडिओला चाहत्यांनी पसंती दिली आहे. खुद्द राखीने हा व्हिडिओ आपल्या इंस्ट्राग्राम अकाउंडवरून शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

- Advertisement -

या व्हिडिओवर मजेशीर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. अनेक चाहते तिने असे का केला असा प्रश्न विचारत आहेत. यावर राखीने उत्तर दिले की, मी श्रीदेवी यांची खूप मोठी फॅन आहे. त्याचं कारणासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ शेअर करत राखीने चाहत्यांना आवाहन केली की, आपल्या प्रतिक्रिया मला कमेंटसमधून कळवा. बिग बॉस सीजन १४ ही राखीने दणाणून सोडला होता. आपल्या अतरंगी अवतराने तिने साऱ्यांचेच मनोरंजन केले. बिग बॉसमधील राखीचा ‘ज्युली’ अवताराने चाहत्यांना पोट धरून हसण्यास भाग पाडले. त्याचबरोबर अभिनव शुक्लावर प्रेमाचा दाव करत राखी ‘प्रेम वेडी’ बनली होती. एकंदरीत राखीच्या अनेक अवतारांना चाहते चांगलीच दाद देतात त्याप्रमाणे नव्या नागीण अवतारालाही चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिले.


हेही वाचा- …जेव्हा अमिताभ बच्चन यांनाच सल्लूभाई समजले फॅन्स

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -