घरCORONA UPDATEबीकेसी कोविड सेंटरमध्ये १५० एन.एस. जी. कमांडोंचे लसीकरण

बीकेसी कोविड सेंटरमध्ये १५० एन.एस. जी. कमांडोंचे लसीकरण

Subscribe

कोविड सेंटरमध्ये प्रथमच अशाप्रकारे एकत्रितपणे १५० एन.एस. जी. कमांडोंचे लसीकरण करण्यात आले

मुंबई महापालिकेच्या बीकेसी कोविड सेंटरमध्ये आज १५० एन.एस. जी. कमांडोंचे लसीकरण करण्यात आले. पालिकेच्या कोविड सेंटरमध्ये प्रथमच अशाप्रकारे एकत्रितपणे १५० एन.एस. जी. कमांडोंचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे बीकेसी सेंटरमधील आरोग्य खात्याच्या डॉक्टर, नर्स, कर्मचाऱ्यांचे एन.एस. जी. कमांडोंतर्फे आभार व्यक्त करण्यात आले आहेत. तर देशसेवेचे व्रत घेतलेल्या एन.एस. जी. कमांडोंना लस देण्याचा व त्यांच्यासाठी आपले कर्तव्य पार पडण्याचा ‘आनंद कुछ औरच’ असल्याचे बीकेसीमधील डॉक्टर, नर्स यांच्या चेहऱ्यावर दिसून आले. कोरोनावरील लसीचा हा बूस्टर डोस १५० एन.एस. जी. कमांडोंना एकदम सहजतेने दिला गेला आणि संपूर्ण सैन्याने बीकेसी लसीकरण टिमचे कौतुक केले. या क्रांतिकारक लसीकरण मोहिमेदरम्यान बीकेसी टीम देशाची सेवा करत असल्याचा आनंदच आहे, असे बीकेसी कोविड सेंटरमधील अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा – Lockdown: नाईलाजाने काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल, मुख्यमंत्र्यांचा इशारा
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -