घरट्रेंडिंगWorld Sparrow Day 2021: या चिमण्यांनो परत फिरा रे...

World Sparrow Day 2021: या चिमण्यांनो परत फिरा रे…

Subscribe

आज २० मार्च. आजचा दिवस 'जागतिक चिमणी दिवस' म्हणून जगभरात पाळला जातो. जगभरात चिमणी संवर्धनासाठी जागर करणारा दिवस म्हणून या दिवसाची ओळख

 

धावपळीच्या जीवनशैलीत सध्या चिऊताई काळाच्या ओघात दिसेनाशी झाली. वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास चिमण्यांच्या संख्येस कारणीभूत ठरला असल्याचे देखील सांगितले जात आहे. वाढत्या शहरीकरणासह सिमेंट-काँक्रिटीकरणाच्या जंगला मुक्या पशु-पक्षांचा निवारा हरवताना दिसतोय. यामुळे सकाळी गावाच्या अंगणात असणारा चिऊताईंचा चिवचिवाट, घराच्या खिडकीवर येऊन काहीक्षण विसावणारी चिऊताई, तर कधी खुलेआम घरात जेवणाच्या ताटाजवळ येऊन बसणारी चिमणी नाहिशी होताना दिसतेय. या पार्श्वभूमीवर चिमण्यांचे संरक्षण आणि त्याविषयीच्या जागृती करण्यासाठी २० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून पाळला जातो. चिमण्यांचा चिवचिवाट पुन्हा ऐकण्यासाठी आपल्याला एक पाऊल पुढे टाकणं गरजेचं आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -