घरताज्या घडामोडीपरळीत मतदान केंद्रावर भाजप राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने

परळीत मतदान केंद्रावर भाजप राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने

Subscribe

गेल्या पाच वर्षांत बीडला गुण्या गोविंदाने निवडणूका झाल्या होत्या. ही पद्धत कायम ठेवावी लागेल याचे भान सर्वांनी ठेवायला हवे, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली.

बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकींच्या मतदानात राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांत भिडल्याचे समोर आले आहे. मतदानाची वेळ ही दुपारी ४ वाजेपर्यंत होती. मात्र वेळ संपल्यानंतरही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मतदारांना मतदानासाठी घेऊन आले होते, असा आरोप भाजपने केला आहे. याच पार्श्वभूमीवर परळीमधील औद्योगिक वसाहत कार्यालयातील मतदान केंद्रासमोर भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भाष्य केले आहे. गेल्या पाच वर्षांत बीडला गुण्या गोविंदाने निवडणूका झाल्या होत्या. ही पद्धत कायम ठेवावी लागेल याचे भान सर्वांनी ठेवायला हवे, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली.

त्यांना वाटले होते ८० ते ९० टक्के मतदान होईल मात्र मतदान केवळ ५१ टक्के मतदान झाले आहे इथेच त्यांची मानहानी झाली. साधारण निवडणूका झाल्या असत्या तर आज आमचा विजय नक्की होता, म्हणून विरोधकांनी मागच्या दाराने अशाप्रकारचा गोंधळ घालून या निवडणूकीला अशाप्रकारचा रंग दिला, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.

- Advertisement -

मतदानाची वेळ संपल्यानंतर शेवट्या क्षणात एका एका मतासाठी भांडत आहेत. मतदानाची वेळ दुपारी चार वाजेपर्यंत होती. मात्र चार वाजल्यानंतरही मतदारांना मतदान करायला सांगितले जात होते. मतदानाची वेळ संपली आहे आता मतदान झाले नाही पाहिजे अशी भूमिका भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतली. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाले. मात्र याचा आम्हाला काही फरक पडत नाही. मी स्वत: माझ्या कार्यकर्त्यांसाठी इथे आली आहे. आमचे कार्यकर्त्ये या गोष्टी सांभाळण्यासाठी समर्थ आहे,असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.


हेही वाचा – बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर भाजप नेत्या पंकजा मुंडेचा बहिष्कार

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -