घरदेश-विदेशAssembly Election 2021: काँग्रेसप्रणीत UDF चा जाहीरनामा प्रसिद्ध; गरिबांसाठी बांधणार ५ लाख...

Assembly Election 2021: काँग्रेसप्रणीत UDF चा जाहीरनामा प्रसिद्ध; गरिबांसाठी बांधणार ५ लाख घरं!

Subscribe

केरळमध्ये विरोधी पक्ष कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तिरुवनंतपुरम येथे “पीपल्स मॅनिफेस्टो” जाहीर केला. या जाहीरनाम्यात सर्व सफेद कार्डधारकांना पाच किलो तांदूळ मोफत आणि गरिबांसाठी पाच लाख घरं बांधण्याचे आश्वासन दिले आहे. यूडीएफने सबरीमाला येथील भगवान अयप्पा मंदिराच्या परंपरेचे रक्षण करण्यासाठी आणि राजस्थानच्या धर्तीवर शांतता व सौहार्द विभाग तयार करण्याचे विशेष कायदे तयार करण्याचे आश्वासनही जनतेला दिले आहे.

- Advertisement -

महिला मतदारांवर भुरळ पाडण्यासाठी पक्षाने सरकारी नोकरीसाठी परीक्षा घेऊ इच्छिणाऱ्या मातांच्या वयोमर्यादेत दोन वर्षाची सवलत देण्याचे आश्वासनही दिले आहे. याशिवाय जाहीरनाम्यात, ४० ते ६० वर्षांच्या नोकरी-व्यवसायातील महिलांना दोन हजार रुपये मासिक पेन्शन देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. कोरोनापासून बाधित झालेल्या लोकांना निशुल्क फूड पॅकेट्स आणि इतर सुविधा देणार असल्याचेही जाहीरनामा समितीचे अध्यक्ष बेनी बेहानन यांनी सांगितले.

त्याचबरोबर, सत्ताधारी एलडीएफ पक्ष सामाजिक सुरक्षा पेन्शन १६०० रुपयांवरून वाढवून २ हजार ५०० पर्यंत करणार आहे. यासह रोजगार नसलेल्या घरगुती महिलांना पेन्शन देण्याचे आश्वासन देखील दिले आहे.

- Advertisement -

केरळमध्ये येत्या ६ एप्रिल रोजी विधानसभा निवडणुका होणार असून त्याचा निकाल २ मे रोजी लागणार आहे. केरळमध्ये साधारण १४० जागांवर विधानसभेचे मतदान होणार आहे. २०१६ च्या केरळ विधानसभा निवडणुकीत माकपच्या (CPIM) नेतृत्वाखालील युती एलडीएफने ९१ जागा जिंकल्या होत्या आणि सरकार स्थापन केले. त्याचप्रमाणे केरळमधील २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसप्रणीत यूडीएफ युतीने ४७ जागा जिंकल्या होत्या.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -