घरCORONA UPDATECorona Vaccination: अल्लाह हमे इस महामारी से बचाए! ओवेसींनी घेतली Covid-19 लस

Corona Vaccination: अल्लाह हमे इस महामारी से बचाए! ओवेसींनी घेतली Covid-19 लस

Subscribe

एमआयएमचे अध्यक्ष आणि लोकसभा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आज कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली असून ते म्हणाले की, ‘कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी लस आपल्याला मदत करते आणि आपल्या जवळच्या व्यक्तींचा धोका देखील कमी करते. जे लोक लसीकरणासाठी पात्र आहे, त्यांनी लवकरात लवकर अपॉइंटमेंट घेऊन लस घ्यावी. अल्लाह आपल्याला या महामारीपासून वाचवेल.’ माहितीनुसार ओवेसी यांनी कोव्हिशिल्ड लस घेतल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

संपूर्ण देशभरात १६ जानेवारीपासून लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली. त्यानंतर १ मार्चपासून लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. या दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद मोदी यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’लस मोदींनी घेतली. त्यानंतर अनेक मोठ्या नेत्यांनी कोरोना लसीचा डोस घेतला. याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील कोरोनाची लस घेतली. शरद पवार यांनी सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड लस टोचून घेतली.

११ मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत जे. जे. रुग्णालयात कोरोनाची लस घेतली. ‘कोव्हॅक्सिन’या लसीचा उद्धव ठाकरे यांनी पहिला डोस घेतला. त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींनी कोरोनाची लस घेतली. शिवाय उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनीही कोरोना लसीचा पहिला डोस घेतला.

- Advertisement -

हेही वाचा – परमबीर सिंग यांची सर्वोच्च न्यायालयात धाव; आरोपांची सखोल चौकशी करण्याची केली मागणी


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -