घरमनोरंजनकंगनाच्या वाढदिवस दिनी ''थलायवी'' चा ट्रेलर प्रदर्शित

कंगनाच्या वाढदिवस दिनी ”थलायवी” चा ट्रेलर प्रदर्शित

Subscribe

कंगनाच्या वाढदिवसानिमित्त तिचा आगामी चित्रपट थलायवी चा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.

तमिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री तथा लोकप्रिय अभिनेत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित ”थलायवी” या आगामी चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. थलाइवी चित्रपटात काम करणारी मुख्य अभिनेत्री कंगना राणावत हीने आपल्या सोशल मीडियावर याची घोषणा केली आहे. थलायवी या चित्रपटाची चर्चा गेले अनेक दिवसांपासून बॅालिवूड मध्ये रंगत आहे. प्रेक्षकही या चित्रपटाची आतूरतेने वाट पाहत आहेत. आता खूद्द कंगनाने आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवर याचा खूलासा केला आहे . ”जयललिताने वयाच्या १७ व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण केल होते. तिचा पहिलाच चित्रपट थिएटरमध्ये १०० दिवस चालला होता!” २३ मार्चला कंगनाचा वाढदिवसही आहे. या खास दिवशी चित्रपटाचा  ट्रेलर रिलीज होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

 मुंबई आणि चैन्नई मध्ये हा ट्रेलर लॉन्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ट्रेलर लॉन्चच्या दिवशी दिग्दर्शक विजय व प्रोड्यूसर देखिल उपस्थित राहणार आहेत. दिग्दर्शक विजय यांनी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च इवेंट विषयी म्हणाले की थलायवी हा खूप प्रचंड असा बहुविख्यात, प्रभावशाली तसेच करोडो लोकांच्या प्रेरणास्थान असणाऱ्या जयललिता यांची अमर गाथा आहे.या चित्रपटाचा ट्रेलर लॅान्च सोहळा देखिल भव्य झाला पाहीजे. यामुळे चैनई बरोबरच मुंबईतही ट्रेलरच्या प्रकाशन सोहळ्याच आयोजन करण्यात आलं आहे. कंगना आपल्या वादग्रस्त वक्तव्यामूळे नेहमीच चर्चेत असते. ‘थलायवी’ चित्रपटासाठी कंगनाने भरपूर मेहनत केली आहे.

- Advertisement -

हे वाचा- प्राजक्ता माळीने घरात साजरा केला ‘हापूस आंबा महोत्सव’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -