घरCORONA UPDATECorona Update: देशात कोरोनाचा विस्फोट! पाच महिन्यानंतर आढळले ५० हजारांहून अधिक रुग्ण!

Corona Update: देशात कोरोनाचा विस्फोट! पाच महिन्यानंतर आढळले ५० हजारांहून अधिक रुग्ण!

Subscribe

देशात कुठेतरी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत असतानाच अचानक कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. त्यामुळे संपूर्ण देशात पुन्हा एकदा २०२०मधली परिस्थिती उद्भवतानाचे चित्र दिसत आहे. त्यामुळे देशवासियांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पाच महिन्यांनंतर ५० हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ५३ हजार ४७६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २५१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर २६ हजार ४९० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी १७ लाख ८७ हजार ५३४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ६० हजार ६९२ रुग्ण मृत्यूमुखी पडले असून १ कोटी १२ लाख ३१ हजार ६५० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या Active रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. ३ लाख ९५ हजार १९२ Active रुग्णांची संख्या आहेत. आतापर्यंत ५ कोटी ३१ लाख ४५ हजार ७०९ जणांचे कोरोना लसीकरण झाले आहे.

- Advertisement -

२४ मार्चपर्यंत २३ कोटी ७५ लाख ३ हजार ८८२ कोरोनाच्या चाचण्या झाल्या असून यापैकी १० लाख ६५ हजार २१ कोरोनाच्या चाचण्या काल (बुधवारी) दिवसभरात झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.

- Advertisement -


हेही वाचा – कोरोनाची परिस्थिती चिंताजनक! Swiggyने घेतला मोठा निर्णय


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -