घरताज्या घडामोडीकोरोनाची परिस्थिती चिंताजनक! Swiggyने घेतला मोठा निर्णय

कोरोनाची परिस्थिती चिंताजनक! Swiggyने घेतला मोठा निर्णय

Subscribe

स्विगी २ लाखांहून अधिक डिलीव्हरी पार्टनर्सना देणार कोरोना लस

सध्या देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव वाढत आहे. २०२० मधील कोरोनाची परिस्थिती पुन्हा एकदा उद्भवते का? अशी भीती लोकांमध्ये पसरली आहे. याच अनुषंगाने फूड डिलिव्हरी App असणाऱ्या स्विगीने (Swiggy)ने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. २ लाखांहून जास्त डिलीव्हरी पार्टनर्सचे कोरोना लसीकरण करण्याचा निर्णय स्विगीने घेतला आहे. दरम्यान केंद्र सरकारद्वारे १ एप्रिल २०२१ पासून ४५ वर्षांहून अधिक वय असणाऱ्यांसाठी लसीकरणाची सुरुवात केली जाणार आहे.

काल (बुधवारी) स्विगीद्वारे अशी घोषणा करण्यात आली की, या लसीकरणाच्या मोहीमेत पहिल्या टप्प्यात स्विगीचे जे ५ हजार ५०० डिलीव्हरी पार्टनर्स ज्यांचे, वय ४५ वर्षांहून अधिक आहे आणि जे लसीकरणासाठी पात्र आहेत, त्यांना लस दिली जाईल. त्यानंतर मोहीमेच्या शेवटपर्यंत आपल्या २ लाखांहून जास्त डिलीव्हरी पार्टनर्सना लसीकरण करण्यासाठी स्विगी प्रोत्साहित करेल. जेणेकरून ते अत्यावश्यक सेवा निरंतरपणे उपलब्ध करू शकतील. त्यामुळे या लसीकरण मोहीमेला डिलीव्हरी पार्टनर्सने प्राधान्य द्यावे, असे कंपनीकडून आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisement -

या लसीकरण मोहीमबद्दल घोषणा करताना स्विगीचे सीओओ विवेक सुंदर म्हणाले की, ‘गेल्या एका वर्षात आमचे डिलीव्हरी महिला आणि पुरुष महत्त्वाच्या काळात लाखो भारतीयांपर्यंत जेवण आणि इतर अत्यावश्यक वस्तू पोहोचवत आहेत. राष्ट्रासाठी ते एक लाईफ लाईन झाले आहेत. आपण या कोरोना महामारीसोबत लढण्यासाठी खूप प्रयत्न करत आहोत. आम्ही आमच्या कंपनीत जागरूकता करत आहोत आणि आपल्या सर्व डिलीव्हरी पार्टनर्सना लसीकरण मोहीमेत सामिल करत आहोत. आम्ही लस डिलीव्हरी पार्टनर्सना लस देतानाच्या वेळेत झालेल्या पगाराच्या नुकसानाची भरपाई देखील देऊ. डिलीव्हरी पार्टनर्सचे हे आभार मानण्याचे आणखी एक पाऊल आहे, जे केवळ एक आवश्यक सेवा प्रदाता म्हणून स्वतःची नाही तर त्यांच्या कुटुंबाची आणि त्यांच्या समाजाची सेवा करत आहेत.’

लसीकरण होण्यापूर्वी त्यांच्या डिलिव्हरी पार्टनरसाठी वर्कशॉप आणि समुपदेशन सत्रे आयोजित करून जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि आवश्यक माहिती व माहितीची दळणवळण करण्यासाठी स्विगी हेल्थकेअर पार्टनरसमवेत काम करीत आहे, असे विवेक सुंदर यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – स्विगी, फूडपांडा, झोमॅटो डिलीव्हर फ्रॉम मुंबईच्या झोपडपट्ट्या


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -