घरदेश-विदेशपाकच्या पायघड्या! कापूस आणि सुती धाग्यासाठी आता भारतावरच भिस्त

पाकच्या पायघड्या! कापूस आणि सुती धाग्यासाठी आता भारतावरच भिस्त

Subscribe

गेल्या कित्येक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात असणारी दुश्मनी आता मैत्रीच्या रूपात बदलताना दिसतेय. पाकिस्तानकडून सीमेवर होणाऱ्या कुरघोड्यांमुळे भारताचे पाकिस्तानसोबत संबंध ताणले गेले होते. त्यामुळे पाकिस्तानने भारतासोबत होणारी देवाणघेवाण बंद केली होती. त्यामुळे दोन्ही देशातील व्यवहार पूर्णपणे ठप्प झाला होता. मात्र आता पुन्हा पाकिस्तानने भारतासोबत व्यवहार करण्यास परवानगी दिली आहे. पाकिस्तानात कापूस आणि साखरेच्या आभावामुळे हा निर्णय घेणं भाग पडले आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील इमरान सरकारने भारतासोबत व्यापार करण्यास मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान दिवसाच्या (Pakistan Day) निमित्ताने पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना पाकिस्तान दिनाचे पहिले पत्र लिहिल्यानंतर आणि पंतप्रधान मोदींना दिलेल्या उत्तरानंतर संबंध सुधारण्यास सुरूवात झाली आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने असे म्हटले की, पाकिस्तानच्या आर्थिक समन्वय समितीने भारताला कापूस आणि सुती धागा आयात करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानची कापूस आणि सुती धाग्यासाठी भारतावरच भिस्त असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, पाकिस्तानच्या मंत्रिमंडळाने कापसाच्या आयातीला परवानगी दिली आहे. पाकिस्तान मंत्रिमंडळाने खासगी क्षेत्रालाही साखर आयात करण्याची देखील परवानगी दिली आहे. यासंदर्भात पाकिस्तानकडून भारताला विनंती केली जाऊ शकते. दरम्यान, पाकिस्तान दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्राला उत्तर देताना इमरान खान यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. यासोबतच त्यांनी एक पत्रही मोदींना लिहिले. ‘पाकिस्तानच्या लोकांना भारतासह सर्व शेजारी देशांशी शांतता आणि सहकार्याचे संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा आहे’, असे त्या पत्रात म्हटले आहे.

- Advertisement -

‘आमचा खात्री आहे की, दक्षिण आशियातील दीर्घकालीन शांती आणि स्थिरता भारत आणि पाकिस्तानमधील विशेषत: जम्मू-काश्मीर वादावरील सर्व प्रश्‍न सोडविण्यावर अवलंबून आहे. सकारात्मक आणि परिणामपूर्वक संवादासाठी पूरक वातावरण तयार करणे महत्वाचे आहे.’, असे इमरान खान यांनी या पत्रात लिहिले.

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचे अभिनंदन करणारे पत्र पाठवले होते. इमरान खान यांना पाठवलेल्या अभिनंदनपर पत्रात पंतप्रधान मोदींनी म्हटले की, पाकिस्तानला भारताशी मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत आणि त्यासाठी दहशतवादमुक्त वातावरण अत्यंत महत्वाचे आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या पत्रात कोरोनाविरूद्धच्या लढ्याचा उल्लेखही केला आणि इमरान खान आणि पाकिस्तानच्या जनतेला शुभेच्छा दिल्यात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -