घरमहाराष्ट्रमुंबई - गोवा महामार्गावर भीषण अपघातात ५ ठार

मुंबई – गोवा महामार्गावर भीषण अपघातात ५ ठार

Subscribe

राजापुरमध्ये गणेश भक्तांच्या गाडीला आज दुपारी अपघात झाला. या अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

लांजा येथील वाकेड घाटामध्ये आज भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणाचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी दुपारी घडला असून जखमींना जवळच्या रुग्णालात दाखल करण्यात आले आहे. गणेश भक्तांच्या गाडीला वाकेड घाटाजवळ भीषण अपघात झाला.

नेमके काय घडले?

मुंबई – गोवा महामार्गावर लांजा तालुक्यातील वाकेड गावामध्ये हा अपघात झाला. गणेश भक्तांची इको कार लांजा या ठिकाणी पोहोचली. त्याच दरम्यान वाकेड येथे समोरुन येणाऱ्या भरधाव लक्झरीची इको कारला धडक झाली. या धडकेत कारचा अक्षरश: चक्काचूर झाला असून या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -